मावळ ऑनलाईन –पैशांच्या वादातून मारहाण करून एका इस्टेट एजंटकडून(Talegaon Dabhade Crime News) जबरदस्तीने पैसे आणि मोबाईल हिसकावून घेतले. ही घटना 22 सप्टेंबर रोजी रात्री तळेगाव दाभाडे येथील सुमा आदित्य हॉटेल, सोमाटणे फाटा येथे घडली.
Dehuroad Crime News : गांजा बाळगल्याप्रकरणी तरुणाला अटक
याप्रकरणी स्वप्नील अरुण लांडे (35, सोमाटणे फाटा, तळेगाव दाभाडे) यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. मयूर सुहास मुऱ्हे (33, सोमाटणे गावठाण, तळेगाव दाभाडे) याला अटक करण्यात आली (Talegaon Dabhade Crime News) आहे.
Sharad Pawar : शिक्षण क्षेत्रात ‘सरहद’चे सामाजिक दायित्वातून महत्त्वपूर्ण कार्य – शरद पवार
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी स्वप्नील आणि त्यांचा मित्र सुनील चव्हाण हे जेवण करत असताना आरोपी तेथे आला. त्याने फिर्यादीच्या दुचाकीच्या बदल्यात घेतलेले पैसे परत न दिल्याच्या रागातून शिवीगाळ करत मारहाण केली. आरोपीने फिर्यादीच्या शर्टच्या खिशातून 3,000 रुपये जबरदस्तीने काढून घेतले. तसेच, कमरेला खोचलेला कोयता बाहेर काढून हवेत फिरवत “दोन दिवसांत राहिलेले पैसे मिळाले नाहीत तर जिवंत सोडणार नाही” अशी धमकी दिली. तळेगाव दाभाडे पोलीस (Talegaon Dabhade Crime News) तपास करत आहेत.