मावळ ऑनलाईन – तळेगाव दाभाडे येथील नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाकडे नगराध्यक्ष पदासाठी ( Talegaon Dabhade BJP) ४ तर नगरसेवक पदासाठी ७६ जणांनी मुलाखती दिलेल्या असून लवकरच अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येईल, अशी माहिती पक्षाचे प्रभारी गणेश भेगडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
नगरपरिषदेची निवडणूक जाहीर झाल्याने शहरातील सर्वच राजकीय पक्षांच्या हालचाली वेगवान झाल्या आहेत. भारतीय जनता पक्षाकडून १४ प्रभागांसाठी ७६ उमेदवारांनी अर्ज दाखल केले असून नगराध्यक्ष पदासाठी चार उमेदवारांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली ( Talegaon Dabhade BJP) आहे.
नगराध्यक्ष पदासाठी भाजपचे माजी शहराध्यक्ष संतोष दाभाडे पाटील, माजी उपनगराध्यक्ष किशोर भेगडे, माजी उपनगराध्यक्ष गिरीश (तात्या) खेर आणि महाराष्ट्र प्रदेश किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष गणेश भेगडे यांनी कार्ड कमिटीसमोर मुलाखती ( Talegaon Dabhade BJP) दिल्या.
CA Exams : सीए परीक्षांचे निकाल जाहीर; मुकुंद अगीवाल, नेहा खणवाणी आणि ए. राजलक्ष्मी देशात अव्वल
इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती कार्ड कमिटीचे पदाधिकारी माजी राज्यमंत्री संजय (बाळा) भेगडे, चंद्रकांत शेटे, रवींद्र (नाना) दाभाडे, इंदरमल ओसवाल, रवींद्र आप्पा भेगडे, सुरेश झेंड, अशोक दाभाडे चिराग खांडगे, अशोक दाभाडे आणि प्रकाश ओसवाल यांच्या उपस्थितीत पार पडल्या. माजी उपनगराध्यक्ष गिरीश तात्या खेर यांनी आभार ( Talegaon Dabhade BJP) मानले.



















