मावळ ऑनलाईन –श्री विठ्ठल मंदिर संस्थेच्या वतीने(Talegaon Dabhade) भगवान श्रीकृष्ण जन्मोत्सवानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह आणि श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन शुक्रवार दि ८ ऑगस्ट २०२५ ते शनिवार दि१६ ऑगस्ट २०२५ दरम्यान करण्यात आले असून, या सोहळ्यादरम्यान विविध धार्मिक कार्यक्रम राबविण्यात येत आहेत.
ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे दिव्य प्रयोजन आणि गाथा पूजन शुक्रवारी (दि८) उद्योजक संतोष भेगडे यांच्या हस्ते संपन्न झाले. दररोज पहाटे काकड आरती, महापूजा,अभिषेक, प्रवचन, कीर्तन आणि रात्री जागर अशा धार्मिक उपक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे.
Metro : भक्ती-शक्ती ते चाकण मार्गाच्या मेट्रोचा डीपीआर तयार करा
MP Shrirang Barne : खासदार श्रीरंग बारणे यांनी एक्सप्रेस हायवेवर जाऊन वाहिली शहिदांना श्रद्धांजली
महापूजा मा. राज्यमंत्री (महाराष्ट्र राज्य) संजय (बाळा) विश्वनाथराव भेगडे, हेमंत मधुकर शेळके, संजय रमेश बावीसकर, विलास बबनराव काळोखे, दादासाहेब विठ्ठल उऱ्हे, रोनक विलास ओसवाल, विक्रम बाळासाहेब काकडे तसेच सौ. भागिरथीबाई खंडेराव गुंड (विश्वस्त, संस्था तळेगाव दाभाडे) या मान्यवरांच्या हस्ते होणार आहे.
या सोहळ्याचे नियोजन श्री विठ्ठल मंदिर संस्थेचे अध्यक्ष माजी राज्यमंत्री संजय बाळा भेगडे, विश्वस्त बाळकृष्ण आरडे महाराज, नित्य उपचार समितीचे अध्यक्ष हरिदास वनारसे, कार्याध्यक्ष देवराम महाराज खराटे,यतीन भाई शहा, खजिनदार नारायण धामणकर, सचिव विलास गायकवाड, पुरोहित अतुल देशपांडे,श्यामराव भेगडे, शेखर गुंड, मुरलीधर ढेकणे आणि सोनबा गोपाळे गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.

अखंड हरिनाम सप्ताह आणि ज्ञानेश्वरी पारायणाचे नेतृत्व ह.भ.प. नथुराम जगताप पाटील करत आहेत. या सप्ताहात दररोज प्रवचन आणि कीर्तनांचा कार्यक्रम होणार असून, प्रवचनात ह.भ.प. दत्तात्रय महाराज जोशी यांचे अध्यात्मिक मार्गदर्शन लाभणार आहे.
कीर्तन सेवेसाठी ह.भ.प. अशोक महाराज मोरे, ह.भ.प. यतिराज महाराज लोहर, ह.भ.प. बाळकृष्ण महाराज कोंडे, ह.भ.प. शंकर महाराज मराठे, ह.भ.प. संतोष महाराज काळोखे, ह.भ.प. मधुसूदन शास्त्री, ह.भ.प. मंगलदास महाराज जगताप आणि ह.भ.प. चिदंबरश्वर किसन महाराज साखरे या ख्यातनाम कीर्तनकारांच्या सुश्राव्य कीर्तनाने भाविकांना अध्यात्मिक आनंद मिळणार आहे.
ज्ञानदान सेवा उद्योजक चेतन केशव भेगडे, राजकुमार अंबादास हरिहर, संजय रमेश बावीसकर, विलास बबनराव काळोखे, संतोष गोविंद निंबळे, आनंद बबन घोडके, विक्रम बाळासाहेब काकडे, राजेश राजाराम म्हस्के आणि सागर हिरामण भेगडे यांच्या सहकार्याने पार पडणार आहे.
महाप्रसाद सेवा दुपारी १२ ते २ या वेळेत उद्योजक संतोष भिमशेठ आगरवाल, ज्ञानेश्वर कृष्णाजी फाकटकर, भरत कृष्णाजी फाकटकर, सौ. सुलोचना नारायण खोल्लम, संतोष गोविंद लोणकर, प्रसाद जयवंत जाधव, पांडुरंग मधुकर अवसरकर, सुर्यकांत पंढरीनाथ फाकटकर, निवृत्ती पंढरीनाथ फाकटकर आणि सुरेश विठ्ठल आवटी यांच्या सहकार्याने दिली जाणार आहे.
तसेच दररोज रात्री ९.०० ते १०.०० या वेळेत कीर्तनकार, भजनी मंडळी व सेवेकरी यांच्यासाठी महाप्रसाद अॅड. युवराज सुरेश टकले यांच्या वतीने देण्यात येणार आहे.
या ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याची सांगता शनिवार ( दि१६) उद्योजक राजेश राजाराम म्हस्के आणि राजश्रीताई म्हस्के यांच्या हस्ते सकाळी १० वा होणार आहे. यावेळी काल्याचे कीर्तन डॉ. ह.भ.प. यशोधन किसन महाराज साखरे यांचे होणार असून, त्यानंतर महाप्रसादाचेही आयोजन केले आहे.