situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Talegaon Dabhade : तळेगाव दाभाडे शहर हद्दीत १६२ धोकादायक इमारती ; नगरपालिकेने बजावल्या नोटीस

Published On:
Talegaon Dabhade

मावळ ऑनलाईन – तळेगाव दाभाडे शहर हद्दीत १६२ इमारती या धोकादायक असल्याचे नगर विकास विभागाने केलेल्या पाहणी मधून समोर आले असून शुक्रवार (दि १९) अशा सर्व इमारतीवर धोक्याची सूचना दर्शवणारे फलक नगरपालिका प्रशासनाने लावले असून संबंधित घरमालकांना (Talegaon Dabhade) तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक यांनी नोटीस बजावल्या आहेत.

Vadgaon Maval : भाजपा आंदर मावळ , वडगाव , कामशेत मंडलच्यावतीने संकल्प सभा संपन्न

नगर विकास विभागाने केलेल्या पाहणीत मोडकळीस आलेल्या इमारतीमध्ये ७० ते १०० वर्ष जुन्या इमारतींची संख्या सर्वाधिक आहे. मुळ गावठाणात तसेच विविध भागांमध्ये असलेल्या बैठ्या निवासी घरांमध्ये अजूनही नागरिक राहत आहेत.१६२ घरे आणि इमारतीची दुरावस्था झाली असल्याचे नगर विकास विभागाने केलेल्या पाहणीत आढळून आले आहे.

Vadgaon Maval : भाजपा आंदर मावळ , वडगाव , कामशेत मंडलच्यावतीने संकल्प सभा संपन्न

या इमारती व घरांच्या भिंती कमकुवत होणे, मोडकळीस येणे, पाया खचने, छतांचा आधार कमकुवत होऊन ते तिरके होणे आदी प्रकारामुळे त्या केव्हाही पडण्याचा धोका असल्याचे पाहणीत आढळून आले असून महाराष्ट्र नगरपरिषद,नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५चे कलम ११५ नुसार वापरात असलेली मिळकत काढून टाकण्यासाठी संबंधित घरमालकांना नोटीस (Talegaon Dabhade) बजावण्यात आल्या आहेत.

Pimpri Chichwad Crime News 23 June 2025 : कंपनीतील पार्ट चोरून नेताना दोघांना पकडले

या मिळकत बांधकामामुळे आजूबाजूंच्या रहिवाशांना धोका होऊन वित्तहानी होऊ शकते असा दावा नोटीसमध्ये केला आहे.त्यामुळे या इमारतींचे बांधकाम मोकळे करून त्वरित उतरवून घ्यावे.या इमारत बांधकामामुळे आजूबाजूंच्या रहिवाशांना धोका अथवा अपाय झाल्यास तसेच या ठिकाणी काही वित्तहानी अथवा जीवितहानी झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी घरमालकांची असेल असा स्पष्ट उल्लेख बजावण्यात आलेल्या नोटीसमध्ये करण्यात (Talegaon Dabhade) आला आहे.

Follow Us On