मावळ ऑनलाईन – टेम्पोमध्ये भरून दिलेल्या साहित्याचा अपहार केल्याप्रकरणी टेम्पो चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 21 ते 23 जून या कालावधीत तेज कॅरिअर प्रायव्हेट लिमिटेड जाधववाडी तळेगाव (Talegaon) येथे घडली.
Lonavala Crime News : लोणावळ्यात सायबर फसवणुकीचा प्रकार; मोबाईलवर धमकी देत घेतले ८३ हजार रुपये
गौरव शरद टिंगरे (42, कर्वेनगर, पुणे) यांनी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सुरेश सिताराम बंडगर (जांभूळवाडी, मावळ) यांच्या विरोधात गुन्हा दाखल (Talegaon) करण्यात आला आहे.
Pimpri Chichwad 26 June 2025 : बेकायदेशीरपणे गॅस रिफील प्रकरणी एकास अटक
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी गौरव यांचा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय आहे. त्यांच्याकडे आरोपी सुरेश बंडगर हा चालक म्हणून काम करतो. सुरेश याच्या ताब्यात दिलेल्या टेम्पोमध्ये जाधववाडी तळेगाव दाभाडे येथून गुहागर येथे पोहोचविण्यासाठी पाईप भरून दिले होते. त्यातील 86 हजार 825 रुपये किमतीच्या पाईपचा सुरेश याने अपहार केल्याचे फिर्यादीत म्हटले (Talegaon) आहे.