मावळ ऑनलाईन : टाकवे बुद्रुक येथील (Takve Budruk)शिवशाही मित्र मंडळाने दरवर्षी प्रमाणे गणेश उत्सवानिमित्त गुणवंत विद्यार्थी व ग्रामपंचायत मधील सफाई कामगारांचा विशेष सन्मान केला. मंडळाचे यंदा २६ वे वर्ष आहे. मंडळाकडून दरवर्षी विविध सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा विषयक उपक्रम राबवले जातात.
या वेळी मंडळाचे संस्थापक टाकवे बुद्रुक ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच स्वामी जगताप सरपंच अविनाश असवले, माजी उपसरपंच रोहिदास असवले,खादी ग्रामोद्योग संघाचे चेअरमन अंकुश आंबेकर, माजी उपसरपंच स्वामी जगताप, पोलिस पाटील अतुल असवले, टाकवे वि का स सोसायटीचे माजी चेअरमन राजू शिंदे,व्यापारी असो.अध्यक्ष योगेश मोढवे, माजी ग्रा.सदस्य नवनाथ आंबेकर, टाकवे विविध कार्य.सोसायटीचे माजी संचालक दिलीप आंबेकर, शालेय शिक्षण समिती अध्यक्ष संदीप मालपोटे,रोहिदास खुरसुले, गणेश मंडळाचे अध्यक्ष कमलेश असवले, उपाध्यक्ष विशाल मोरे,सचिव बाबाजी असवले,संभाजी धामणकर,प्रदीप मोढवे,शिवसेना उपतालुका प्रमुख सोमनाथ कोंडे आदी मान्यवर उपस्थित होते.
Devendra Fadnavis: सिंहगड रस्त्यावर पुण्यातील सर्वात मोठा उड्डाणपूल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण करून वाहतुकीसाठी झाला खुला

इयत्ता दहावीमध्ये वैष्णवी धोंडिबा कालेकर,वैष्णवी संतोष लष्करी, सेजल संतोष कोंडे, तर इयत्ता बारावीमध्ये योगिता गणेश असवले, ज्ञानेश्वरी नारायण मोढवे, जगदीश गोकुळ कोकाटे आदी अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाल्याबद्दल सन्मान चिन्ह, शाल, नारळ व पुष्पगुच्छ तसेच ग्रामपंचायतीमधील सफाई कामगारांचा शाल, श्रीफळ व साडी, महिलांना व पुरुषांना पूर्ण पोशाख देऊन त्यांचा यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.
शिवशाही मित्र मंडळाच्या माध्यमातून सामाजिक कला क्रीडा, आरोग्य आदी क्षेत्रात विविध उपक्रम राबविले जातात. शिवजयंती, दहीहंडी,जागतिक महिला दिन, रक्तदान शिबिर, मोफत डोळे तपासणी, शिबिरात चष्मे वाटप केले जातात.