नमो उद्यान योजनेतून तळेगाव, लोणावळा नगरपरिषद तसेच वडगाव व देहू नगर पंचायतींना लाभ
मावळ ऑनलाईन – मावळ तालुक्यातील नागरी ( Sunil Shelke) भागातील नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे. तालुक्यातील नगरपरिषद व नगरपंचायत हद्दीतील उद्यानांच्या विकासासाठी ‘नमो उद्यान’ योजनेअंतर्गत तब्बल ४ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या कामांना शासनाकडून प्रशासकीय मान्यताही प्राप्त झाली असून, लवकरच या ठिकाणी उद्यान विकासाची कामे सुरू होणार आहेत, अशी माहिती मावळचे आमदार सुनील शेळके यांनी दिली.
या मंजूर निधीचा तपशील पुढीलप्रमाणे आहे : ( Sunil Shelke)
- तळेगाव दाभाडे नगरपरिषद – रु. १ कोटी
- लोणावळा नगरपरिषद – रु. १ कोटी
- वडगाव नगरपंचायत – रु. १ कोटी
- श्री क्षेत्र देहू नगरपंचायत – रु. १ कोटी
मावळ तालुक्यातील या चारही महत्त्वाच्या शहरांमध्ये अनेक वर्षांपासून नागरिक उद्यान विकासाची मागणी करीत होते. उद्यानांची दुरवस्था, अपुरी सुविधा आणि वाढते शहरीकरण ( Sunil Shelke) यामुळे नागरिकांना विरंगुळ्यासाठी व मुलांना खेळण्यासाठी योग्य जागा उपलब्ध होत नव्हती. नमो उद्यान योजनेतून मिळालेल्या निधीमुळे या ठिकाणचे उद्यान आधुनिक स्वरूपात सज्ज होणार असून, नागरिकांसाठी आरोग्यदायी वातावरण निर्माण होईल.


Gajanan Mehendale : ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांना अखेरचा निरोप
आमदार सुनील शेळके म्हणाले की, “महायुती सरकारच्या माध्यमातून मावळ तालुक्यातील नागरी भागांना उद्यान विकासासाठी ४ कोटींचा निधी मिळवून दिल्याचा मला आनंद आहे. या उपक्रमामुळे स्थानिक नागरिक, महिला, ज्येष्ठ नागरिक व लहान मुलांना दर्जेदार सुविधा ( Sunil Shelke)असलेली उद्याने उपलब्ध होतील. मावळ तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी मी सातत्याने प्रयत्नशील राहणार आहे.”
आमदार शेळके यांनी यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार तसेच नगर विकास विभागाचे आभार ( Sunil Shelke)मानले.
Fraud : फसवणुकीप्रकरणी महिलेवर गुन्हा दाखल
नागरिकांसाठी उद्याने ही केवळ मनोरंजनाची साधने नसून, सामाजिक संवादाचे व आरोग्य संवर्धनाचे महत्त्वाचे केंद्र आहेत. त्यामुळे या निधीमुळे मावळ तालुक्यातील नागरी भागातील नागरिकांच्या दीर्घकाळच्या अपेक्षांची पूर्तता होणार आहे, असा विश्वास व्यक्त करण्यात ( Sunil Shelke) आला आहे.