मावळ ऑनलाईन – आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र आणि खगोल भौतिकशास्त्र ( Sumit Bandale)स्पर्धेत वडगाव मावळ येथील सुमित दिलीप बंडाळे याला रौप्य पदक मिळाले. त्याला मागील वर्षी देखील या स्पर्धेत सुवर्ण पदक आणि आंतरराष्ट्रीय गणित स्पर्धेत रौप्य पदक मिळाले होते. अभ्यासासह त्याने खेळामध्ये देखील प्राविण्य मिळवले असून राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये सुवर्णपदकांची कमाई केली आहे.
सुमीत हा भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था (IISER) बेरहमपूर,ओरिसा येथे तिसऱ्या वर्षात शिक्षण घेत असून खेळासोबतच अभ्यासातही सातत्यपूर्ण नेत्रदीपक कामगिरी करत आहे.
MLA Sunil Shelke : आमदार सुनील शेळके यांच्या जनसंवाद अभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद
२०२४ मध्ये ह्याच स्पर्धेत सुवर्ण पुरस्कार तर आंतरराष्ट्रीय गणित स्पर्धेत रौप्य पुरस्कार प्राप्त केले होते. ह्याअगोदर २०२१ व २०२२ ह्या वर्षी योगासन ह्या खेळप्रकारात शसुमीतने राष्ट्रीय तसेच खेलो इंडिया स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले होते. सलग तिन वर्षे महाराष्ट्र राज्य स्पर्धेत वैयक्तिक योगासन स्पर्धेचे सुवर्णपदक पटकावत आपले निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले ( Sumit Bandale)होते.
खेळ व अभ्यासात सातत्यपूर्ण कामगिरीबाबत सर्वच स्तरावरून सुमीतचे अभिनंदन व हार्दिक शुभेच्छा दिल्या जात आहेत. विद्यार्थ्यांसाठी सुमीतचे यश अनुकरणीय तसेच प्रोत्साहनपर ठरत आहे. सुमीत हा वडगाव मावळ निवासी दिलीप बंडाळे व रंजना बंडाळे ह्यांचा सुपुत्र आहे.
सुमीतने त्याच्या यशाचे श्रेय शिस्तबद्ध जीवनपद्धती, अभ्यासाचे योग्य नियोजन, प्रामाणिकपणे सकारात्मक राहून केलेली मेहनत, आई वडीलांचे आशिर्वाद व वेळवेळो ( Sumit Bandale) मिळणारे मोलाचे मार्गदर्शन ह्या बाबींना दिले आहे.