situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Srirang Kalaniketan : श्रीरंग कलानिकेतनच्या ४० व्या वर्धापनदिनी सायली तळवलकरांच्या गायनाने आली बहार

Updated On:
Srirang Kalaniketan

मावळ ऑनलाईन –  श्रीरंग कलानिकेतनचा ४० वा वर्धापनदिन रविवार दिनांक ८ जून २०२५ रोजी आपल्या वनश्री नगरमधील सभागृहात मोठ्या उत्साहात संपन्न झाला. उपाध्यक्ष राजीव कुमठेकर यांनी सर्व उपस्थित रसिकांचं व कलाकारांचे (Srirang Kalaniketan) स्वागत केले.

अध्यक्ष डॉक्टर नेहा कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले. त्यांनी आपल्या प्रास्ताविकात संस्थेची जडणघडण व संस्थेचा ४० वर्षातील प्रवास उलगडून सांगितला. संस्थापक कै. पं. शरद जोशी यांची आठवण यानिमित्ताने करण्यात आली.

Maval Action : मंगरुळ परिसरात बेकायदेशीर उत्खननावर महसूल खात्याची मोठी कारवाई; २५ वाहने जप्त, गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू

डॉ नेहा कुलकर्णी, डॉ राजेंद्र कुलकर्णी, डॉ विलास परिपत्यदार, राजीव कुमठेकर विनय कशेळकर, शेखर बुवा व्यास विश्वास देशपांडे तसेच मुख्य कलाकार सौ सायली तळवलकर यांच्या हस्ते कै. शरद जोशींच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करण्यात ( Srirang Kalaniketan) आले.

सौ. सायली सत्यजित तळवलकर यांनी आपल्या गायनाची सुरुवात करताना आपण तळेगावात प्रथमच गायन करीत असल्याचा आनंद व्यक्त केला. तसेच त्यांना हे संधी मिळाली त्याचे श्रेय त्यांनी तळेगावातील संगीत शिक्षिका निशा अभ्यंकर यांना दिले.अध्यक्षा डॉक्टर नेहा कुलकर्णी यांच्या हस्ते सर्व कलाकारांचा सन्मान करण्यात आला. कार्यवाह विनय कशेळकरांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.

Alandi : इंद्रायणी नदी पुलाजवळील पाण्याच्या पाईप लाईन दुरुस्तीचे काम पूर्ण ; शहरातील टाक्या भरल्यानंतर होणार पाणीपुरवठा


सायली यांनी आपल्या गायनाची सुरुवात अहिर भैरव या रागातील ‘रसिया म्हारा’ हा बडा ख्याल विलंबित एकतालात सादर केला. पुढे त्याच रागातील आधा त्रितालात ‘नैनवा बरसे’ आणि द्रुत त्रितालात ’अलबेला साजन आयो रे’ या बंदिशी सादर केल्या. पुढे पिलू रागात दादरा हा गायन प्रकार गायला त्याचे बोल होते ’बरसन लागी सावन बुंदिया’. शेवटी ‘बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल’ हा अभंग गाऊन त्यांनी कार्यक्रमाची सांगता ( Srirang Kalaniketan) केली.


त्यांना तबल्यावर दमदार साथ युवा कलाकार श्रुतिशील उद्धव आणि संवादिनीची सुयोग्य साथ तुषार केळकर यांनी केली. या सर्व कलाकारांना रसिकांनी वेळोवेळी टाळ्या वाजवून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

संस्थेतर्फे वर्धापन दिनानिमित्त सर्व उपस्थितांना चहा बिस्किटे व पेढे वाटण्यात आले.

कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी डॉ राजेंद्र कुलकर्णी, डॉ. नेहा कुलकर्णी, विश्वास देशपांडे, प्रकाश दिगंबर जोशी, समीर सहस्रबुद्धे, प्रदीप जोशी, अनिरुद्ध जोशी, राजीव कुमठेकर, विनय कशेळकर, सुनील सोनार, केदार अभ्यंकर आणि लक्ष्मीकांत घोंगडे यांनी मदत ( Srirang Kalaniketan) केली.


Follow Us On