जागतिक संगीत दिनाच्या निमित्ताने अनोखा उपक्रम…
मावळ ऑनलाईन –२१ जून रोजी “जागतिक संगीत दिन” श्रीरंग कला निकेतन संचलीत कराओके क्लबच्या सदस्यांनी अनोख्या पद्धतीने साजरा केला.
Talegaon Dabhade : नूतन महाराष्ट्र अभियांत्रिकीमध्ये प्रशासक मंडळाची पहिली बैठक उत्साहात संपन्न
रात्री ९ वाजल्यापासून पहाटे ५ वाजेपर्यंत सलग ८ तास कराओके सिस्टीमवर हिंदी मराठी गाणी गाऊन क्लबमेंबर्सनी जागतिक संगीत दिन साजरा केला.
क्लबचे २५ सदस्य रात्री ९ वाजता या “गीत-रजनी” त सहभागी होते. पहाटे ५ वाजता मैफलीची सांगता झाली, तेव्हाही १६ सदस्य पूर्ण उत्साहात गाण्यांचा आनंद घेत होते.
ओमकार आणि नामाच्या गजराने गीत-रजनी ची सुरुवात झाली. पहिल्या फेरीत सर्व सदस्यांनी आपल्या आवडीचे पूर्ण गाणे सादर केले. दुसऱ्या फेरीत फर्माईश केलेली गाणी सादर केली तर तिसऱ्या फेरीत प्रत्येक सदस्याने ध्रुवपद व एक कडवे अशा स्वरुपात गाणी सादर केली. एकुण ४६ संपूर्ण गाणी आणि ४० एक कडव्याची गाणी अशी एकुण ८६ गाणी सादर करुन क्लब सदस्यांनी “जागतिक संगीत दिन” झोकात साजरा केला. तरुण सदस्यांपासून ७८ वर्षे वयाच्या तरुण श्री. विलास रानडेकाकां पर्यंत सर्व सदस्य मनापासून या उत्सवात सहभागी झाले होते.
डिसेंबर २०२१ मध्ये सुरु झालेल्या क्लबने आता साडेतीन वर्षे पूर्ण केली असून दर शनिवारी क्लबचे सदस्य श्रीरंग कला निकेतनच्या सभागृहात जमतात आणि एखाद्या थीम नुसार गाणी सादर करुन गाण्यांचा आनंद घेतात आणि देतात. क्लबचे आता ३५ उत्साही सदस्य आहेत आपण ही सामील होऊ शकता.
