Team MyPuneCity – भारतीय लष्कराच्या सर्वांत जुन्या आणि सर्वात मोठ्या दक्षिण विभाग मुख्यालयाचा 131 वा स्थापना दिन पुणे लष्करी तळावर उत्साह आणि अभिमानाने साजरा करण्यात आला. या निमित्ताने दक्षिण कमांड युद्ध स्मारक येथे पुष्पचक्र अर्पण समारंभ आयोजित करण्यात आला.
लष्कराचे दक्षिण विभागप्रमुख लेफ्टनंट जनरल एस. पी. सिंग (अति विशिष्ट सेवा पदक, युद्ध सेवा पदक) यांनी सर्व अधिकारी आणि जवानांच्या वतीने पुष्पचक्र अर्पण करून वीर शहीदांना श्रद्धांजली अर्पण केली. या समारंभाला लष्करी आणि नागरी संरक्षण दलाच्या अधिकाऱ्यांनीही हजेरी लावली.
Palkhi ceremonies: श्री स्वामी समर्थ पालखी सोहळ्याला भाविकांचा अभूतपूर्व प्रतिसाद
लष्कराच्या दक्षिण विभागाचे राष्ट्रीय सुरक्षेतील योगदान मोलाचे आहे. लष्कराच्या या महत्त्वाच्या कमांडचे कार्यक्षेत्र ११ राज्ये आणि ४ केंद्रशासित प्रदेशांपर्यंत विस्तारलेले आहे. तसेच, संरक्षण उत्पादन आणि आत्मनिर्भर भारत अभियानातही दक्षिण कमांड महत्त्वाची भूमिका बजावत आहे.
स्थापना दिनानिमित्त ‘इकोज ऑफ वॅलर’ या विशेष कार्यक्रमाची सुरुवात २९ मार्च २०२५ रोजी करण्यात आली. या उपक्रमांतर्गत दर शनिवारी कमांड युद्ध स्मारक येथे सैन्य बँडचे सादरीकरण तसेच साउंड आणि लेझर शो आयोजित करण्यात येत आहे. हा कार्यक्रम नागरिकांसाठी खुला असून, दक्षिण कमांडच्या गौरवशाली इतिहासाची आणि परंपरांची झलक पाहण्याची संधी मिळणार आहे. तसेच, १ एप्रिल २०२५ रोजी युद्ध स्मारक सकाळी ९:०० ते रात्री ८:०० या वेळेत सर्वसामान्य नागरिकांसाठी खुले ठेवण्यात आले होते, त्यामुळे नागरिकांना शूर वीरांना श्रद्धांजली वाहता आली.
Ramnavami Amrit Mahotsav : श्रीराम नवमीनिमित्त रामवाडी येथे अखंड हरीनाम सप्ताह
दक्षिण कमांडच्या या उपक्रमामुळे सैन्याच्या पराक्रमाची आणि त्यागाची जाणीव नागरिकांना होत आहे. देशाच्या संरक्षण व्यवस्थेत या कमांडचे योगदान अत्यंत महत्त्वाचे असून, भविष्यातही हे योगदान अधिक बळकट करण्याचा संकल्प दक्षिण कमांडने केला आहे.