मावळ ऑनलाईन – जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील सोमाटणे फाट्याजवळील टोलनाका (Somatane Toll Plaza) बेकायदेशीर असून तो तत्काळ आणि कायमस्वरूपी बंद करण्यात यावा, अशी जोरदार मागणी माजी नगराध्यक्ष व ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक बाळासाहेब जांभुळकर यांनी केली आहे. अन्यथा येत्या 22 जुलैपासून बेमुदत उपोषण सुरू करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. बुधवारी (दि. 16) घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही भूमिका स्पष्टपणे मांडली.
Rashi Bhavishya 17 July 2025 : कसा जाईल आपला आजचा दिवस?
या पत्रकार परिषदेला माजी नगरसेवक व आरटीआय कार्यकर्ते अरुण माने, फुले-शाहू-आंबेडकर प्रतिष्ठानचे सचिव जयंत कदम, सामाजिक कार्यकर्ते सचिन भांडवलकर, जमीर नालबंद, किशोर कवडे, दिलीप डोळस आदी उपस्थित होते.
जांभुळकर म्हणाले की, केंद्र सरकारच्या नियमानुसार दोन टोलनाक्यांमधील किमान अंतर 60 किलोमीटर आणि नगरपालिका हद्दीपासून किमान 10 किलोमीटर असावे, मात्र सोमाटणे टोलनाका हे दोन्ही निकष धुडकावत तळेगाव दाभाडे नगरपरिषद हद्दीपासून केवळ 2 किमी आणि उर्से टोलनाक्यापासून केवळ 6 किमी अंतरावर आहे. त्यामुळे हा टोलनाका पूर्णतः बेकायदेशीर आहे.
Vadmukhwadi Mishap : नाल्यात पडलेल्या व्यक्तीला जीवनदान
वाहतूक कोंडी व अपघातांचे प्रमाण वाढले
सचिन भांडवलकर यांनी सांगितले की, ‘बांधा-वापरा-हस्तांतरण करा’ (BOT) या तत्त्वावर उभारण्यात आलेल्या या प्रकल्पाची मूळ रक्कम 2019 पूर्वीच वसूल झाली असूनही टोल वसुलीला अवैधरित्या मुदतवाढ देण्यात आली आहे. यामुळे सरकारकडून स्थानिकांची फसवणूक झाली असून आता हा अन्याय सहन केला जाणार नाही.
जयंत कदम यांनी या टोलनाक्याला ‘जिझिया कर’ असे संबोधून तीव्र शब्दांत टीका केली. गाडी घेताना पंधरा वर्षांसाठी रस्ताकर घेतला जातो, असे असताना या टोलनाक्याचा अतिरिक्त भुर्दंड जनतेला का सहन करावा लागतो, असा सवाल त्यांनी उपस्थित (Somatane Toll Plaza) केला.
शांततेच्या मार्गाने आंदोलन; जबाबदारी प्रशासनाची
या आंदोलनात सर्वसामान्य जनतेने मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले. आंदोलन शांततेच्या मार्गानेच होईल, मात्र कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला, तर याची पूर्ण जबाबदारी प्रशासनावर राहील, असा स्पष्ट इशाराही यावेळी देण्यात (Somatane Toll Plaza) आला.
सध्या सोमाटणे टोलनाक्यावर जागेअभावी आणि कमी मार्गिकांमुळे वाहनांच्या रांगा लागतात. परिणामी वाहतूक कोंडी व अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर हा टोलनाका कायमस्वरूपी बंद करावा, ही मागणी आता अधिक तीव्र झाली (Somatane Toll Plaza) आहे.