मावळ ऑनलाईन – शिरगाव सोमटणे दरम्यान एक हायवा ट्रक रस्त्याच्या कडेच्या (Somatane Phata Accident) खड्ड्यात उलटला. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र आज (गुरुवारी) दिवसभरातील देहूरोड तळेगाव मार्गावरील हा दुसरा अपघात आहे.
हा अपघात तळेगाव वरून देहूरोडच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर आज सायंकाळी चारच्या सुमारास घडला. अपघातानंतर चालक तिथून निघून गेला होता. घटनास्थळी देहूरोड वाहतूक पोलीस दाखल झाले होते .
संबंधित हायवा (एम एच 14 केओ 3524) हा डस्ट ओव्हरलोड करून घेऊन जात होता यावेळी महामार्गाचे साईड पट्टे खचलेले असल्याने चालकाचे हायवाट्रक वरील नियंत्रण सुटले व तो पलटी झाला. सुदैवाने हायवा ट्रक जवळ दुचाकी किंवा पदाचारी नसल्याने मोठा अनर्थ टळला.
PMC : महापालिका आयुक्तांना विविध आंबेडकरी संघटनांचा पाठिंबा
याच मार्गावर ऑर्डिनन्स फॅक्टरी जवळ आज सकाळी एक ट्रक दुभाजकावर चढला होता. या दोन्ही अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र महामार्गावरून सुसाट चालणाऱ्या ट्रक बद्दल मात्र आता चिंता व्यक्त केली जात (Somatane Phata Accident) आहे.