पुष्प पहिले
मावळ ऑनलाईन (विवेक कुलकर्णी) – रसिकहो आदाब! महान उर्दू दिवंगत शायर मिर्झा गालिब साहब (Shero-shayari) यांचा एक अतिशय सुंदर आणि मनाला धीर देणारा उत्तम असा एक शेर आज तुमच्यासमोर पेश करतोय….
कुछ इस तरहसे मैने जिंदगी को आंसा कर दिया…
कभी किसीसे माफी मांगी कभी किसीको माफ किया..
माणूस जसजसा वयाने आणि अनुभवाने मोठमोठा होत जातो (Shero-shayari) तसतसा तो अधिक प्रगल्भ होत जातो, त्याला फक्त भल्या बुऱ्यातले कळते असे नाही तर कधी कधी तडजोड करणेही कसे उपयुक्त ठरते, हे ही त्याला समजते आणि पटते सुद्धा.
PCMC : पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे – आयुक्त शेखर सिंह
बऱ्याचदा आपल्या आयुष्यात असे अनेक चांगले वाईट प्रसंग येतात जे मनाला कटू वा छान अनुभवही देऊन जातात, मनस्ताप होतो, त्रासही होतो. असह्य झाले तरच माणसाच्या मनातल्या भावनांचा प्रचंड मोठा उद्रेक होतो. अशा वेळी माणूस तारतम्य विसरून जातो आणि हातून काही तरी प्रचंड वाईट घडून जाते जे पुढे मनाला निरंतर वेदना देत राहते. पण ज्याच्या आत एक चांगले मन असते त्याला या नकोशा घटनेने सतत त्रास होत राहतो..याच वा अशा काहीशा (Shero-shayari) अशाच प्रसंगतून होरपळलेल्या पण पश्चातापदग्ध भावनेतून मनाला अधिक त्रास होऊ नये म्हणून कदाचित मिर्झा साहेबांनी हा महान आणि अतिशय अर्थपूर्ण शेर लिहून ठेवला.
TP Scheme in Darumbre : दारुंब्रे गावातील टी.पी. योजनेला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध
यापुढे मी असे तत्वज्ञान माझ्या मनाला ठामपणे आचरणात आणायला सांगेन, ज्या योगे मला पश्चातापच करायला नको. माझा जवळचा माणूस असेल आणि तो कळत नकळत चुकला असेल तर मी त्याला मोठ्या मनाने माफ करेन आणि जर का माझे चुकले असेल तर मी त्याची माफी मागून त्याच्या मनाला झालेल्या जखमेला मलम लावून ती काही (Shero-shayari) प्रमाणात का होईना ती बरी होण्यासाठी प्रयत्न करेन रसिकहो किती सुंदर विचार आहे नाही का?
आपण याला आपल्या आचरणात आणायला काय हरकत आहे?
स्वैर अनुभव आणि भावार्थ
- विवेक कुलकर्णी