मावळ ऑनलाईन –एकमेका साह्य करू,अवघे धरू सुपंथ या न्यायाने (Sham Nikam)काम करून मावळ भूषण कृष्णराव भेगडे यांच्या नावाला साजेसे वैभव पतसंस्थेने प्राप्त करावे असे प्रतिपादन आ. कृष्णराव भेगडे नागरी सहकारी पतसंस्थेचे सचिव शाम निकम यांनी केले.
आ. कृष्णराव भेगडे नागरी सहकारी पतसंस्थेची २७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवारी (दि२०) उत्साहात संपन्न झाली.त्यावेळी सचिव निकम हे बोलत होते.
सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या संचालिका आणि उद्योजिका राजश्रीताई म्हस्के होत्या. तज्ञ संचालक महेशभाई शहा, तानाजी दाभाडे, प्रा.वसंत पवार,कायदेशीर सल्लागार ॲड योगिता लोंढे/ भेगडे,सूर्यकांत अवसरकर,सुरेश वाबळे, भारत कांबळे, निशा इंगळे यांच्यासह मोठ्या संख्येने सभासद व ठेवीदार उपस्थित होते.
Lonavala : श्री वाघजाई देवी मंदिर ट्रस्टच्या वतीने नवरात्र उत्सव
Nisha Balve: निशा बालवे ठरली महाराष्ट्राची सौंदर्यवती


या वेळी संस्थेचे आधारस्तंभ स्व. कृष्णराव भेगडे यांना यावेळी श्रद्धांजली वाहण्यात आली. संस्थेच्या अहवालानुसार,चालू आर्थिक वर्षात संस्थेकडे ३० कोटी ५९ लाख रुपयांच्या ठेवी असून ३२ लाख ४६ हजार रुपयांचा निव्वळ नफा झाल्याचे सांगण्यात आले.यावेळी सभासदांना ८ टक्के लाभांश वाटण्यास एकमताने मंजुरी देण्यात आली.
शाम निकम पुढे बोलताना म्हणाले की, आपण सर्वांनी मार्गदर्शन व सूचना कराव्यात जेणेकरून पतसंस्थेच्या वाटचालीस चालना मिळेल.यावेळी संस्थेचे सभासद प्रा वसंत पवार यांनीही मार्गदर्शन केले.
संस्थेच्या कामकाजावरील विविध विषयांचे वाचन व सादरीकरण सचिव शाम निकम, तज्ञ सल्लागार ॲड सचिन पगडे,आयुब सिकिलकर,खजिनदार श्रीनिवास राऊत व उल्हास हुलावळे यांनी केले.
Lonavala : श्री वाघजाई देवी मंदिर ट्रस्टच्या वतीने नवरात्र उत्सव
Nisha Balve: निशा बालवे ठरली महाराष्ट्राची सौंदर्यवती
संस्थेतील जुने कर्मचारी निवृत्ती दरेकर आणि सरला गोविंद यांना सन्मानचिन्ह देऊन विशेष गौरव करण्यात आला. प्रास्ताविक चेअरमन दीपक जाधव यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तज्ञ सल्लागार ॲड सचिन पगडे यांनी केले तर आभार प्रदर्शन सचिव शाम निकम यांनी मानले.
संपूर्ण कार्यक्रमाचे संयोजन संचालक मंडळ, कामशेत शाखेचे राजेश दाभाडे तसेच मुख्य शाखेचे निवृत्ती दरेकर,सरला गोविंद,वैशाली पाटील, पूजा गळंगे, धनश्री शिंदे,संजय बनसोडे आदी सेवक वर्ग व प्रशांत शेडे, सागर पेंडके या दैनंदिन बचत प्रतिनिधींनी केले.