मावळ ऑनलाईन –‘शब्दरंग कला साहित्य कट्टा’ या साहित्यप्रेमी संस्थेच्या तिसऱ्या दिवाळी अंकाचे प्रकाशन दिनांक १४ ऑक्टोबर रोजी ज्येष्ठ साहित्यिक प्रा. तुकाराम पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी तुकाराम पाटील यांनी दिवाळी अंकातील साहित्याचे सुंदर विवेचन करताना, “दर्जेदार साहित्यनिर्मितीसाठी अशा अंकांची गरज आहे; हा अंक दिवाळीचा आनंद द्विगुणित करणारा ठरेल,” असे गौरवोद्गार काढले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्योती कानेटकर होत्या. त्यांनी (Shabdarang Diwali Anka)प्रास्ताविक करताना “दिवाळी अंक हा शब्दरंग कट्ट्यासाठी अभिमानाची बाब आहे,” असे मत व्यक्त केले.
कार्यकारी संपादक सुभाष भंडारे यांनी दिवाळी अंक निर्मितीचा प्रवास सांगताना, “या अंकावर काम करताना अपार आनंद मिळाला,” असे प्रतिपादन केले.अंकाच्या निर्मितीत श्रीकृष्ण धारप आणि चिंतन मोकाशी यांचे विशेष योगदान राहिले.
Ajit Pawar: शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी आर्थिक मदत मिळणार-अजित पवार
Maval: मावळचे भजनसम्राट ह.भ.प. नंदकुमार शेटे महाराज यांना “महाराष्ट्र भूषण” पुरस्काराने सन्मान
कार्यक्रमाला शब्दरंग कट्ट्याची संपूर्ण कोअर टीम, सभासद तसेच शहरातील मान्यवर उपस्थित होते. यामध्ये लेखक रमेश वाकनिस, ज्येष्ठ साहित्यिक राज अहेरराव, उद्योजक अतुल इनामदार, सलीम भाई शिकलगार, बाळा शिंदे, बाळा दानवले, तसेच संस्थापक अध्यक्ष चंद्रशेखर जोशी आणि डॉ. अनिरुद्ध टोंणगावकर यांचा समावेश होता.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रियांका आचार्य यांनी केले, तर आभार अशोक अडावदकर यांनी मानले.