मावळ ऑनलाईन –ग्रामपंचायतीकडे वारंवार तक्रार करून देखील समस्या (Self-immolation) न सोडविल्याने हताश झालेल्या व्यक्तीने ग्रामसभेत अंगावर रॉकेल ओतून घेत आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. ही घटना सोमवारी (८ सप्टेंबर) खडकाळे येथे घडली. रामचंद्र धावडे असे आत्मदहन करण्याचा प्रयत्न केलेल्या व्यक्तीचे नाव आहे.
Jakhmata Devi : श्री जाखमाता देवीची विधिवत पुनर्प्रतिष्ठापना
धावडे यांचे घर शेतात आहे. ते मागील सहा वर्षांपासून शेतात राहतात. त्यांच्या शेतात (Self-immolation) गावातील सांडपाणी येत आहे. हा प्रकार मागील चार वर्षांपासून सुरु आहे. पाऊस पडल्यानंतर सांडपाण्यात वाढ होऊन हे पाणी त्यांच्या घरात येते. गावातील सांडपाण्यासोबत शेतातील साप, विंचू, बेडूक असे प्राणी देखील घरात येत. मागील चार वर्षांपासून धावडे यांनी ग्रामपंचायतीकडे सांडपाणी इतर ठिकाणी वाळविण्याबाबत मागणी केली. मात्र त्यांना नेहमी उडवाउडवीची उत्तरे मिळाली. सोमवारी खडकाळे ग्रुप ग्रामपंचायत मध्ये ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. या ग्रामसभेत सरपंच रुपेश गायकवाड आणि धावडे देखील उपस्थित होते.
Pune: सिरत कमिटीच्या वतीने हजरत महंमद पैगंबर यांची १५०० वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी
धावडे यांनी ग्रामसभेत आपला प्रश्न उपस्थित केला. ग्रामसेवक धनंजय देशमुख (Self-immolation) यांनी यासाठी निधी नसल्याचे सांगितले. यावेळी देखील नेहमीप्रमाणे त्यांची तक्रार ऐकून घेतली गेली नाही. त्यामुळे वैतागून त्यांनी भर ग्रामसभेत स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतून घेत आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. ग्रामसभेत उपस्थित ग्रामस्थांनी त्यांना अडवून त्यांच्या हातातील रॉकेलची बाटली आणि माचिस हिसकावून घेतले. त्यानंतर कामशेत पोलिसांना बोलावण्यात आले.
धावडे यांच्या जागेत जाऊन तात्काळ पाहणी करण्यात आली. त्यानंतर लगेच जेसीबीच्या साहाय्याने कामाला सुरुवात करण्यात आली. धावडे यांच्या शेतात येणाऱ्या सांडपाण्याच्या लाईन बुजवण्यात आल्या. आजवर निधी नसल्याचे कारण सांगणाऱ्या ग्रामपंचायत प्रशासनाने या घटनेनंतर (Self-immolation) तात्काळ कार्यवाही केली.