मावळ ऑनलाईन – पुणे जिल्ह्यातील घाटमाथ्यावरील भागात सलग पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आज (बुधवारी ) शाळांना सुट्टी (School Holiday) जाहीर करण्यात आली आहे. ही माहिती जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने दिली आहे.
Godumbre Rescue : नदीकाठी पाण्यात अडकलेल्या महिलेला वाचविण्यासाठी मध्यरात्री ‘रेस्क्यू ऑपरेशन’
मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद पुणे यांच्या सूचनेनुसार वेल्हा, भोर, मावळ, मुळशी, खेड, आंबेगाव आणि जुन्नर या तालुक्यांतील घाटमाथ्यावरील सर्व प्राथमिक शाळा एक दिवसासाठी बंद राहणार आहेत. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी पालकांनी विशेष दक्षता घ्यावी, अशा सूचना गटशिक्षणाधिकारी यांना देण्यात आल्या आहेत.
Pimpri Flood : मुसळधार पावसाने पिंपरी-चिंचवड जलमय : शेकडो नागरिकांचे स्थलांतर, प्रशासन अलर्ट
या सुट्टीच्या दिवशी (School Holiday )राहिलेला अभ्यासक्रम रविवारी शाळा सुरू ठेवून पूर्ण करण्याचे आदेशही शिक्षण विभागाने दिले आहेत.
याबाबतचे परिपत्रक संजय नाईकडे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद पुणे यांनी जारी केले असून त्याची प्रत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनाही पाठविण्यात आली आहे.