Team My Pune City – शिवणेतील संत तुकाराम विद्यालयात (School Classroom Inauguration ) १५ सप्टेंबर २०२५ रोजी दोन नवीन वर्गखोल्यांचे आणि विद्यार्थिनींसाठी स्वच्छतागृहांचे उद्घाटन करण्यात आले. हा उपक्रम रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे यांच्या माध्यमातून आणि मॅकवर्ड्स कंपनीच्या सीएसआर फंडातून राबवण्यात आला.
Aadhaar Update : विद्यार्थ्यांच्या आधार अद्ययावत करण्यासाठी पुण्यात मेगा मोहीम
उद्घाटन समारंभात रोटरी क्लबचे कार्यवाह चंद्रकांत शेटे, विद्यालय शालेय समितीचे अध्यक्ष संदीप काकडे, माजी सभापती एकनाथ टिळे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भरत शिंदे आणि कंपनीचे पदाधिकारी उपस्थित होते. इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे अध्यक्ष रामदास काकडे (School Classroom Inauguration ) यांनी शिक्षणाला विकासाचा पाया मानून मॅकवर्ड्सने शैक्षणिक सुविधांसाठी मदत केली असल्याचे सांगितले. क्लबचे माजी अध्यक्ष कमलेश कारले यांनी या वर्गखोल्यांना विद्यार्थ्यांच्या भविष्याची दिशा दाखवणारे मानले.
Aadhaar Update : विद्यार्थ्यांच्या आधार अद्ययावत करण्यासाठी पुण्यात मेगा मोहीम
विशाल नार्वेकर यांनी फोसेकोच्या शैक्षणिक विकासात मॅकवर्ड्सच्या सीएसआर मोहिमेचा भाग म्हणून प्रवेश आणि गुणवत्तेवर भर देण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. विद्यालयाचे मुख्याध्यापक रवींद्र शेळके यांनी प्रास्ताविक केले, तर रामदास टिळे यांनी सूत्रसंचालन (School Classroom Inauguration ) केले.