तळेगाव दाभाडे नगरपरिषद निवडणुकीत तरुणांना संधी देण्याचे संकेत
मावळ ऑनलाईन – तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या ( Satyam Khandge)आगामी निवडणुकीला वेगळाच वेग देत आमदार सुनील शेळके यांनी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे पहिल्या उमेदवाराची घोषणा केली. प्रभाग क्रमांक ७ मधून सत्यम गणेशशेठ खांडगे यांची उमेदवारी त्यांनी जाहीर केली झाली असून, या घोषणेने स्थानिक राजकारणात चैतन्य निर्माण झाले आहे.
महिलांसाठी आयोजित शारदीय नवरात्रोत्सवातील( Satyam Khandge) लकी ड्रॉ कूपन स्पर्धेत शेकडो महिलांच्या उपस्थितीत आमदार शेळके यांनी ही घोषणा केली. आमदार शेळके म्हणाले, “तळेगाव नगरपरिषदेला सुशिक्षित, अभ्यासू आणि सर्वांना सोबत घेऊन जाणारे नेतृत्व हवे. सत्यम खांडगे हे तरुण, कुशल व दूरदृष्टी असलेले व्यक्तिमत्व असून त्यांच्याकडून शहराला नवे भविष्य मिळेल.”
सत्यम खांडगे हे यशस्वी उद्योजक आणि गोल्ड मेडलिस्ट असून अनु ग्रुपच्या ( Satyam Khandge)माध्यमातून अनेक तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्यात त्यांनी मोलाची कामगिरी केली आहे. तसेच मामासाहेब खांडगे चॅरिटेबल ट्रस्ट, खांडगे पतसंस्था आणि मामासाहेब खांडगे सीबीएसई स्कूल या संस्थांद्वारे ते सामाजिक क्षेत्रात सातत्याने कार्यरत आहेत.
Pune Rain Update : पुण्यात आत्तापर्यंत सरासरीपेक्षा ३३ टक्के अधिक पाऊस
उमेदवारी जाहीर होताच तळेगाव स्टेशन परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये आनंदोत्सव साजरा होत असतानाच इतर ( Satyam Khandge) इच्छुकांचा मात्र हिरमोड झाला आहे.
शेळके पुढे म्हणाले, “सत्यम खांडगे यांच्याकडे व्यवस्थापन आणि संघटन कौशल्य आहे. ते नवे तंत्रज्ञान वापरून तळेगाव शहराच्या विकासात मोलाचे योगदान देतील. वडील गणेशशेठ खांडगे यांनी आशीर्वादाचा हात ठेवून तरुण नेतृत्वाला बळ दिले आहे.”
तळेगाव नगरपरिषद निवडणुकीत तरुणांना संधी देण्याचा हा निर्णय काँग्रेस-राष्ट्रवादीच्या धोरणाचा भाग असल्याचे बोलले जात असून, आता या उमेदवारीनंतर इतर पक्ष काय भूमिका घेतात,याकडे तळेगावकरांचे लक्ष लागले ( Satyam Khandge) आहे.