तळेगाव दाभाडे रेल्वे स्टेशन परिसरात विद्यार्थी व जवानांचा उत्स्फूर्त सहभाग
मावळ ऑनलाईन – ‘स्वच्छता ही सेवा’ उपक्रमांतर्गत सरस्वती विद्यामंदिर, तळेगाव दाभाडे (माध्यमिक विभाग) व सीआरपीएफ जवानांच्या ( Saraswati Vidya Mandir) संयुक्त विद्यमाने रेल्वे स्टेशन परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले.
या वेळी सीआरपीएफचे प्रमुख प्रमोद सूर्यभान पवार यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, “प्रत्येक नागरिकाने मी कचरा करणारच नाही अशी भूमिका घेतली, तर कचरा निर्माण होणार नाही. घराबरोबरच परिसर स्वच्छ ठेवणे हे प्रत्येकाचे कर्तव्य( Saraswati Vidya Mandir) आहे.”

Granthottejak Award : यशासाठी ग्रंथविक्रेत्याने वाचकांपर्यंत पोहोचणे आवश्यक-संजय भास्कर जोशी
सरस्वती विद्यामंदिरच्या मुख्याध्यापिका सौ. रेखा परदेशी यांनी सांगितले की, शाळेत दरवर्षी स्वच्छता पंधरवडा साजरा केला जातो; मात्र यावर्षी सीआरपीएफ जवानांसोबत साजरा केलेला उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेची शिस्त निर्माण करण्यास उपयुक्त ( Saraswati Vidya Mandir) ठरेल.
Granthottejak Award : यशासाठी ग्रंथविक्रेत्याने वाचकांपर्यंत पोहोचणे आवश्यक-संजय भास्कर जोशी
या वेळी शाळेच्या अध्यापिका अरुंधती देशमाने, सीआरपीएफ पदाधिकारी तसेच रोटरी क्लबचे प्रमोद टेकवडे यांनीही आपले विचार व्यक्त केले.अभियानात सरस्वती विद्यामंदिरचे स्काऊट-गाईड व राष्ट्रीय हरित सेनेचे दीडशे विद्यार्थी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, सीआरपीएफचे 70 जवान सहभागी झाले. रेल्वे परिसराची स्वच्छता करून तळेगाव रेल्वे स्टेशन ते सरस्वती विद्यामंदिर अशी स्वच्छता रॅलीही ( Saraswati Vidya Mandir) काढण्यात आली.
हा उपक्रम सरस्वती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सुरेश झेंड यांच्या मार्गदर्शनाखाली ( Saraswati Vidya Mandir) पार पडला.