मावळ ऑनलाईन – मंगळवार दिनांक 26 ऑगस्ट 2025 रोजी पंचायत समिती मावळ यांचे तर्फे इंद्रायणी विद्यामंदिर येथे अखिल भारतीय विद्यार्थी( Saraswati Vidya Mandir) विज्ञान मेळावा अंतर्गत विज्ञान नाट्य स्पर्धा व विज्ञान विषयावर आधारित वकृत्व स्पर्धा घेण्यात आली.
Dehu Road Cantonment : देहूरोड छावणी परिषदेत नागरिकांच्या तक्रारींवर आढावा बैठक
यामध्ये सरस्वती विद्यामंदिर तळेगाव दाभाडे येथील माध्यमिक विभागातील इयत्ता नववीतील विद्यार्थिनी कुमारी श्रेया देवळालकर हिने वक्तृत्व स्पर्धेत सहभाग घेतला होता( Saraswati Vidya Mandir) तर डिजिटल इंडिया यावर इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांनी नाटक सादर केले होते. त्याला संगीताची साथ इयत्ता नववीतील सर्वेश देशपांडे या विद्यार्थ्याने दिली होती. या दोन्ही स्पर्धेत सरस्वती विद्यामंदिरचा प्रथम क्रमांक आला असून त्यांची निवड आता जिल्हास्तरावर होणाऱ्या स्पर्धेसाठी झाली आहे .

Indira Atre Award : बालसाहित्यात वैज्ञानिक मांडणीला अधिक महत्त्व – डॉ. सदानंद मोरे
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन सौ सुरेखा रासकर, सौ सुनीता कुलकर्णी व सविता केंगले भोकटे बाईंनी केले होते. विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे सरस्वती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सुरेश झेंड, उपाध्यक्ष दिलीप कुलकर्णी, सर्व पदाधिकारी , मुख्याध्यापिका रेखा परदेशी, सर्व शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले असून जिल्हास्तरावर होणाऱ्या स्पर्धेसाठी ( Saraswati Vidya Mandir) त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.