मावळ ऑनलाईन –सरस्वती विद्यामंदिर तळेगाव दाभाडे येथील ( Saraswati Vidya Mandir) शाळेत शुक्रवार दिनांक 12 सप्टेंबर रोजी पिंपरी चिंचवड परिवहनचे पीएसआय श्री बुवा जगदाळे, पोलीस अंमलदार गणेश शिंदे ,वाहतूक कर्मचारी अंतिम निकम , रमेश भोसले यांनी शाळेला 20 फळझाडे व फुलझाडे भेट दिली व शाळेच्या परिसरात काही रोपांची प्रातिनिधिक स्वरूपात लागवड केली.
विद्यार्थी व शिक्षकांना मार्गदर्शन करताना जगदाळे सर यांनी वाहतुकीच्या नियमाबाबत सर्वांना सतर्क राहण्यास सांगितले व विद्यार्थ्यांच्या वाहतूक कर्मचाऱ्यांचे चारित्र्य प्रमाणपत्र आवश्यक असल्याचे नमूद केले.
यावेळी प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक नवनाथ गाढवे माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ रेखा परदेशी, पर्यवेक्षिका सौ सुरेखा रासकर, पर्यावरण विभाग प्रमुख श्री संजय गायकवाड, शिक्षक वृंद व विद्यार्थी उपस्थित ( Saraswati Vidya Mandir) होते.