मावळ ऑनलाईन – सरस्वती शिक्षण संस्थेच्या सरस्वती विद्या मंदिर मध्ये (Saraswati Vidya Mandir)शनिवार दिनांक 23/ 8 /2025 रोजी श्रावणी अमावस्या (पिठोरी अमावस्या) निमित्ताने मातृदिन माध्यमिक विभागात दुपारी साडेबारा वाजता साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे शितल योगेशचंद्र देवळालकर या उपस्थित होत्या. अध्यात्मिक बुद्धिमत्ता यावर त्यांची पीएचडी झालेली आहे. तसेच संस्थेचे अध्यक्ष सुरेश झेंड हेही यावेळी उपस्थित होते.
शाळेच्या परंपरेनुसार दीपप्रज्वलन व सरस्वती पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक माध्यमिकच्या पर्यवेक्षिका सुरेखा रासकर (Saraswati Vidya Mandir)यांनी केले. सुनीता कुलकर्णी यांनी मातृदिनानिमित्त आईवर विद्यार्थ्यांना माहिती सांगितली. अध्यक्ष यांच्या हस्ते प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला.
Vadgaon Maval News : वडगावात विद्यार्थी बनले मूर्तिकार

Astrological convention : ज्योतिष अधिवेशनात विलास बाफना यांचा सत्कार
श्रेया देवळालकर हिने आईवर केलेली कविता यावेळेस सादर करण्यात आली. सर्व पालकांच्या वतीने मी प्रातिनिधिक स्वरूपात हा सत्कार स्वीकारत असून हा गौरव आमच्या सर्व स्त्री पालकांचा आहे असे सौ शीतल देवळालकर म्हणाल्या. जीवनामध्ये आईचे स्थान किती महत्त्वाचे आहे हे त्यांनी विद्यार्थ्यांना खूप छान पद्धतीने समजून सांगितले.
कल्याणी जोशीबाई यांनी प्रमुख पाहुण्यांचे व मान्यवर पदाधिकारी व सर्व विद्यार्थ्यांचे आभार मानले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाचे नियोजन मुख्याध्यापिका सौ रेखा परदेशी यांनी केले व त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना मातृदिनाच्या शुभेच्छा दिल्या.