मावळ ऑनलाईन – संपूर्ण भारताला वंदनीय असलेले ( Saraswati Vidya Mandir ) वंदे मातरम गीताला यंदा दीडशे वर्षे पूर्ण झाली. या ऐतिहासिक निमित्ताने सरस्वती विद्यामंदिराच्या माध्यमिक विभागात वंदे मातरम गीताचा शतकोत्तर सुवर्ण महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात मुख्याध्यापिका सौ. रेखा परदेशी यांच्या प्रास्ताविकाने झाली. शिक्षिका सौ. कल्याणी जोशी यांनी वंदे मातरम गीताचा इतिहास आणि महत्त्व यावर माहिती दिली. सरस्वती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री. सुरेश झेंड, उपाध्यक्ष श्री. दिलीप कुलकर्णी, शिक्षण मंडळ सदस्य श्री. विश्वास देशपांडे, बालवाडी विभाग प्रमुख सौ. सोनाली काशीद तसेच पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. संस्था प्रतिनिधींच्या हस्ते भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात ( Saraswati Vidya Mandir ) आले.
या वेळी वंदे मातरम संदर्भात विशेष प्रदर्शन भरवण्यात आले. संस्था सदस्य, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी संपूर्ण वंदे मातरम गीत सामूहिक स्वरात गायले. त्यानंतर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिक्षक, विद्यार्थी आणि पालक यांना श्री. संजय गायकवाड यांनी मतदानाची शपथ दिली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ७ नोव्हेंबर रोजी शाळेत प्रवेश घेतला होता. त्यांचे स्मरण म्हणून त्यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले आणि हा दिवस विद्यार्थी दिवस म्हणून साजरा करण्यात आला. सूत्रसंचालन सुनीता कुलकर्णी यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम ( Saraswati Vidya Mandir ) घेतले.




















