मावळ ऑनलाईन – रोटरी क्लब गोल्डन तळेगाव दाभाडे व चिखले एक्वा (Santosh Pardeshi)व इलेक्ट्रॉनिक्स यांच्या संयुक्त विद्यमाने सामाजिक भावनेतुन युथ डायरेक्टर रो.दिनेश चिखले यांची मुलगी ध्रीती हिच्या तिसऱ्या वाढदिवसानिमित्त लोकमान्य टिळक शाळा क्रमांक तीन तळेगाव दाभाडे या ठिकाणी विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य व खाऊ वाटप करण्यात आले.
प्रसंगी गोल्डन रोटरी चे अध्यक्ष संतोष परदेशी यांनी सामाजिक बांधिलकी सर्वांनी जपावे असे मत व्यक्त केले व आपल्या मुलीचा वाढदिवस आगळावेगळा पद्धतीने विद्यार्थ्यांसमवेत साजरा केल्याबद्दल चिखले परिवाराला धन्यवाद दिले.
Jambhulwadi:जांभूळवाडी येथे वाहनाच्या धडकेत लोखंडी हाईटगेज तुटले, मोठ्या वाहनाना बंदी
सर्व विद्यार्थ्यांनी ध्रीतीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन आनंद व्यक्त केला.


या कार्यक्रमाच्या प्रसंगी मुख्याध्यापिका कुलकर्णी मॅडम व सर्व शिक्षक वर्ग तसेच रोटरी क्लब ऑफ गोल्डन तळेगाव दाभाडे चे अध्यक्ष रो. संतोष परदेशी,रो.प्रशांत ताये,रो.प्रदीप टेकवडे,रो.विजय गोपाळे,रो.सुरेश बावबंदे,रो.प्रदिप मुंगसे,रो.राकेश गरुड,रो.चेतन पटवा,रो.बसप्पा भंडारी,रो.ललित देसले तसेच दाभाडे एम्पायर येथील चिखले परीवाराचे मित्र मोठ्या संखेने उपस्थित होते.