Team MyPuneCity – उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपून ३० तास उलटल्यानंतरही संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याच्या (Sant Tukaram Sugar Foctory) संचालक मंडळ निवडणुकीची अंतिम उमेदवार यादी गुलदस्त्यातच असल्यामुळे संभ्रमाच्या वातावरणात भर पडली आहे. आज सकाळी ११ नंतर उमेदवार यादी जाहीर करण्यात येईल, असे पत्रकारांना सांगणारे निवडणूक निर्णय अधिकारी मुकुंद पवार यांचा मोबाईल फोन आज दिवसभर ‘नॉट रिचेबल’ असल्यामुळे संशयकल्लोळ अधिकच वाढला आहे.
उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत मंगळवारी (२५ मार्च) दुपारी तीन वाजता संपली. संचालक मंडळाच्या (Sant Tukaram Sugar Foctory) २१ जागांसाठी निवडणूक रिंगणात उतरलेल्या १९५ उमेदवारांपैकी किती जणांनी माघार घेतली, हे ही बातमी लिहून पूर्ण होईपर्यंत स्पष्ट झालेले नव्हते. निवडणूक बिनविरोध होण्यासाठी १७४ उमेदवारांनी माघार घेणे आवश्यक होते. त्यापैकी १७० उमेदवारांच्या माघारीची पुष्टी झाली असली तरी अजून चार उमेदवारांनी माघार घेतली की नाही, हे मात्र अजूनही गुलदस्त्यातच आहे. त्यामुळे निवडणूक बिनविरोध झाली की काही जागांसाठी मतदान घ्यावे लागणार, याबाबतची उत्सुकता अजूनही कायम आहे.
Armaan Kohli: प्रसिद्ध अभिनेते आरमान कोहली यांच्या घरात चोरी
माघार घेणाऱ्या उमेदवारांची संख्या मोठी असल्याने उमेदवारांची अंतिम यादी आज (बुधवारी) सकाळी प्रसिद्ध करण्यात येईल, असे निवडणूक निर्णय अधिकारी मुकुंद पवार यांनी ‘मावळ ऑनलाईन’शी मंगळवारी रात्री बोलताना सांगितले होते. आज दिवसभर पत्रकारांनी अंतिम उमेदवार यादीसाठी वारंवार मुकुंद पवार यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांच्याशी कोणत्याही प्रकारे संपर्क होऊ न शकल्याने तर्क-वितर्क लढविले जाऊ लागले आहेत.
संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याच्या (Sant Tukaram Sugar Foctory) आतापर्यंत झालेल्या दोन्ही निवडणुका एक तांत्रिक अडचण वगळता बिनविरोध झाल्याचा इतिहास आहे. यावेळची निवडणूकही कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष विदुरा तथा नानासाहेब नवले यांच्या नेतृत्वाखाली बिनविरोेध करण्याबाबत सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीत एकमत झाले होते. त्यानुसार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मध्यस्थीने नवले यांच्या नेतृत्वाखाली संत तुकाराम शेतकरी विकास पॅनेलच्या अधिकृत उमेदवारांची यादी तयार करण्यात आली. अजितदादांचे प्रतिनिधी म्हणून सुरेश घुले व नानासाहेब नवले यांच्या सहीने काल (मंगळवारी) दुपारी अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली. त्यानंतर उर्वरित उमेदवारांनी माघार घेण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा सुरू होती.
Drinking water: पुणे – पिंपरी चिंचवडकरांचं आरोग्य धोक्यात, 79 ठिकाणचं पाणी पिण्यास अयोग्य
नवले यांच्या संत तुकाराम शेतकरी विकास पॅनेलच्या (Sant Tukaram Sugar Factory) २१ अधिकृत उमेदवारांच्या यादीमध्ये (Sant Tukaram Sugar Foctory) विद्यमान संचालकांपैकी विदुरा विठोबा नवले, चेतन हुशार भुजबळ, बापूसाहेब जयवंतराव भेगडे, ज्ञानेश्वर तथा माऊली सावळेराम दाभाडे, अनिल किसन लोखंडे या पाचजणांना पुन्हा संधी देण्यात आलेली असून १६ नवीन चेह-यांना निवडणूक रिंगणात उतरविण्यात आले आहे.
काल रात्री उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध होणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात माघारीची मुदत संपून ३० तासांचा कालावधी झाल्यानंतरही अंतिम उमेदवार यादी जाहीर न करण्यामागे काय गौडबंगाल आहे, असा प्रश्न कारखान्याच्या सभासदांकडून करण्यात येत आहे. काहीही करून निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सर्व आटापिटा सुरू आहे का, असा सवालही विचारण्यात येत आहे.
संत तुकाराम शेतकरी विकास पॅनेलच्या (Sant Tukaram Sugar Foctory) अधिकृत उमेदवारांची यादी पुढील प्रमाणे आहे.
▪️गट क्र. १ हिंजवडी- ताथवडे
१ नवले विदुराजी विठोबा
२ भुजबळ चेतन हुशार
३ जाधव दत्तात्रय गोपाळ
▪️गट क्र. २ पौड – पिरंगुट
१ ढमाले धैर्यशील रमेशचंद्र
२ गायकवाड पशवंत सत्तू
३ उभे दत्तात्रय शंकरराव
▪️गट क्र. ३ तळेगाव- वडगाव (Sant Tukaram Sugar Factory )
१ भेगडे बापुसाहेब जयवंतराव
२ दाभाडे ज्ञानेश्वर सावळेराम
३ काशिद संदीप ज्ञानेश्वर
▪️गट क्र. ४ सोमाटणे- पवनानगर
१ कडू छबुराव रामचंद्र
२ लिम्हण भरत मच्छिंद्र
३ बोडके उमेश बाळू
▪️गट क्र. ५ खेड- शिरूर हवेली (Sant Tukaram Sugar Factory )
१ लोखंडे अनिल किसन
२ कातोरे विलास रामचंद्र
३ काळजे अतुल अरूण
४ भोंडवे धोंडीबा तुकाराम
▪️महिला राखीव
१ अरगडे ज्योती केशव
२ वाघोले शोभा गोरक्षनाथ
▪️अनुसूचित जाती / जमाती (Sant Tukaram Sugar Factory)
भालेराव लक्ष्मण शंकर
▪️इतर मागासवर्ग
कुदळे राजेंद्र महादेव
▪️विमुक्त जाती/भटक्या जमाती
कोळेकर शिवाजी हरिभाऊ