रोटरी सिटी आयोजित खेळ रंगला पैठणीचा भव्य उपक्रम संपन्न
मावळ ऑनलाईन – प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे भक्कम स्री शक्ती ( Rotary City)असते. समाज परिवर्तन घडविण्यामध्ये स्री शक्तीचे अनमोल योगदान असते, असे मत आमदार सुनील शेळके यांच्या पत्नी सारिका शेळके यांनी व्यक्त केले. रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे सिटी, भैरवनाथ महाराज युवा ग्रुप साळुंब्रे यांचे संयुक्त विद्यमाने व उद्योजक रो. निलेश राजाराम राक्षे यांच्या सौजन्याने साळुंब्रे येथे महिलांसाठी भव्य खेळ रंगला पैठणीचा हा उपक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमात प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलत होत्या.


उपक्रमाचे उदघाटन डिस्ट्रिक्ट ३१३१ च्या माजी प्रांतपाल रो.मंजू फडके यांच्या हस्ते ( Rotary City) उदघाटन झाले असून देवीची महाआरती पाहुण्यांच्या हस्ते संपन्न झाली. कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे ” लग्नानंतर होईलच प्रेम” स्टार प्रवाह फेम सिने नाट्य अभिनेत्री आभा वेलणकर यांच्या उपस्थितीमुळे गावातील अबालवृद्ध व माता-भगिनींनी प्रचंड गर्दी केली होती.स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ मावळ तालुक्याचे लोकप्रिय आमदार सुनील शेळके यांच्या सुविद्य पत्नी सारिकाताई शेळके यांच्या हस्ते संपन्न झाला.
Pune : शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने व्यावसायिकाची ९७ लाख ५० हजारांची फसवणूक
महाराष्ट्राची कुलस्वामिनी, आदिशक्ती,आदिमाया आई तुळजा भवानी मातेच्या शारदीय नवरात्र उत्सवात शेतकरी परिवारातील माता-भगिनींसाठी रोटरी क्लब ऑफ तळेगाव सिटीने उपक्रम घेऊन एक आदर्श घातला आहे,प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे भक्कम स्री शक्ती असते, समाज परिवर्तन घडविण्यामध्ये स्री शक्तीचे अनमोल योगदान असते असे प्रतिपादन कार्यक्रमाच्या अध्यक्षा सारिकाताई शेळके यांनी करताना रोटरी सिटीच्या विविधांगी कार्याचे कौतुक केले व माता-भगिनींना मौलिक मार्गदर्शन केले.
भारताची पवित्र संस्कृती सण, उत्सव आणि परंपरा ग्रामीण भागात खऱ्या अर्थाने ( Rotary City) जोपासण्याचे काम केले जाते आणि शेतकरी कुटुंबातील महिलांच्या कलागुणांना वाव देणारा खेळ रंगला पैठणीचा हा स्तुत्य उपक्रम रोटरी सिटीने राबवून महिला भगिनींना प्रेरणा दिली असे प्रतिपादन डिस्ट्रिक्ट ३१३१ च्या माजी प्रांतपाल रो.मंजू फडके यांनी करताना रोटरी सिटीच्या कामकाजाचे कौतुक केले.
MLA Sunil Shelke : मावळच्या फुलशेतीला जागतिक मंचाकडे नेणारा ऐतिहासिक उपक्रम
महिला सक्षमीकरण उपक्रमांतर्गत भविष्यात माता-भगिनींसाठी अनेक उपक्रम ( Rotary City)राबविण्याचा मानस रोटरी सिटीचे अध्यक्ष भगवान शिंदे यांनी व्यक्त करताना ग्रामीण भागासाठी रोटरी सिटीच्या माध्यमातून भरीव काम करणार असल्याची ग्वाही देताना रोटरी सिटीच्या कार्यपद्धतीची माहिती दिली. सुप्रसिद्ध अभिनेत्री आभा वेलणकर, संस्थापक अध्यक्ष विलास काळोखे, उपाध्यक्ष सुरेश दाभाडे, सेक्रेटरी संजय मेहता, ज्येष्ठ मार्गदर्शक दिलीप पारेख, क्लब ट्रेनर सुरेश शेंडे, मेंबरशिप डायरेक्टर नितीन शहा, अभिनेते मोहन खांबेटे इ.नी माता भगिनींना नवरात्र उत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी नगरसेविका रो.मनिषा पारखे यांनी केले.सूत्रसंचालन डायरेक्टर रो.स्वाती मुठे यांनी केले तर आभार प्रदर्शन युथ डायरेक्टर रो.निलेश राक्षे यांनी केले.
स्पर्धेचा निकाल प्रथम क्रमांक पैठणीच्या मानकरी सौ.शितल विधाटे,द्वितीय क्रमांक सोन्याची नथ सौ.योगिनी मडगे, तृतीय क्रमांक चांदीचा छल्ला सौ. निकिता शेळके, चतुर्थ क्रमांक ( Rotary City)इलेक्ट्रिक शेगडी सौ.राधिका कड,पाचवा क्रमांक हेअर ड्रायर सौ.नीलम कोळी यांना मिळाला असून सौ.रतन मार्कस यांना लकी ड्रॉ मध्ये इस्त्री व सौअश्विनी यादव यांना ज्यूसर मिळाला असून सर्व सहभागी स्पर्धक भगिनींना भेटवस्तू देण्यात आली. आवाजाचा बादशहा भावोजी रो.राजेश बारणे यांनी खेळ रंगला पैठणीचा हा कार्यक्रम घेतला.
संग्राम जगताप,आनंदराव रिकामे,संजय वाघमारे विश्वास कदम, शरयू देवळे,निलम रोहिटे, सुनंदा वाघमारे, वैशाली लगाडे, वर्षा खारगे, तानाजी मराठे,सूर्यकांत म्हाळसकर,विलास वाघमारे, दशरथ ढमढेरे इ.सह भैरवनाथ महाराज युवा ग्रुपचे पदाधिकारी व सदस्य समस्त ग्रामस्थ साळुंब्रे यांनी उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम ( Rotary City) घेतले.