मावळ ऑनलाईन – महिला वर्ग कुटुंबाची व इतर सदस्यांची काळजी घेत असताना ( Rotary City) स्वतःकडे दुर्लक्ष करतो त्यामुळे अनेक आजारांना सामोरे जावे लागते महिलांनी कुटुंबाबरोबर स्वतःची काळजी घेणे काळाची गरज आहे असे प्रतिपादन रोटरी सिटीचे संस्थापक अध्यक्ष विलास काळोखे यांनी केले.
रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे सिटी, ग्रामीण स्वयंरोजगार निर्मिती संस्था व तळेगाव जनरल हॉस्पिटल अंतर्गत तळेगाव कॅन्सर सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने वराळे येथील रुडसेट संस्थेत” ब्रेस्ट कॅन्सर अवेअरनेस प्रोग्राम” आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरात काळोखे बोलत होते.
Vadgaon Maval News : सुनिता महाजन ठरल्या महादुर्गा विजेत्या
सध्या भारत देशामध्ये ब्रेस्ट कॅन्सर या आजाराचे प्रमाण वाढत असून हा आजार कमी करण्यासाठी उपाय योजना,महिलांनी घ्यावयाची काळजी, या आजाराची लक्षणे इत्यादी विषयी माहिती शिबिरामध्ये ( Rotary City) देण्यात आली.

समाजातील युवकांना अनेक प्रकारचे व्यावसायिक प्रशिक्षण देऊन स्वतःच्या पायावर उभे करण्याचं मौलिक योगदान गेली कित्येक वर्ष रुडसेट संस्था करत असून अनेक स्वावलंबी पिढ्या निर्माण करून समाजासाठी रुडसेटने महत्त्वपूर्ण योगदान आहे ,असे प्रतिपादन रोटरी सिटीचे अध्यक्ष भगवान शिंदे यांनी करताना भविष्यात रुडसेट व रोटरी सिटी संयुक्तपणे समाज हिताचे उपक्रम राबवतील अशी ग्वाही दिली.
आजच्या संगणक युगात माता भगिनी पुरुषांच्या बरोबरीने प्रत्येक क्षेत्रात कार्यरत आहेत, रुडसेट संस्था ग्रामीण व शहरी भागातील युवकांना रोजगार मिळावा म्हणून सेवाभावी योजनांतून आदर्शवत काम करत आहे असे प्रतिपादन तळेगाव शहरातील युवा उद्योजक सत्यम गणेश खांडगे यांनी करताना अत्याधुनिक टेक्नॉलॉजी व सामाजिक संस्था यांच्या कार्याची सांगड घालून समाजाचा विकास साधता येतो हे सांगताना रोटरी व रुडसेट यांच्या कार्यपद्धतीचे कौतुक केले भविष्यात या सेवाभावी संस्थेला आपण सर्वतोपरी मदत करू असे ग्वाही खांडगे यांनी ( Rotary City) दिली.
Rashi Bhavishya 8 Oct 2025 – कसा जाईल आपला आजचा दिवस?
रुडसेट संस्थेची उद्दिष्टे, हेतू, कार्यपद्धती इत्यादीविषयी सविस्तर माहिती संस्थेचे संचालक राजकुमार बिरादार यांनी मनोगताद्वारे दिली. तळेगाव जनरल हॉस्पिटल अंतर्गत तळेगाव कॅन्सर हॉस्पिटलच्या डॉ. शुभांगी डोईफोडे यांनी शिबिरामध्ये विविधांगी माहिती अनेक उदाहरणांच्या साहाय्याने सांगताना हा आजार होऊ नये यासाठी घ्यावयाची काळजी, लक्षणे व उपायोजना इत्यादी विषयी माहिती महिलांना दिली.
शिबिरामध्ये ८० महिलांचा सहभाग होता त्याचबरोबर डॉ. अजय ढाकेफळकर यांनी देखील कार्यशाळेला सर्वोत्तम मार्गदर्शन केले.भविष्यात तळेगाव कॅन्सर हॉस्पिटलच्या माध्यमातून सार्वजनिक क्षेत्रात सामाजिक काम करणाऱ्या संस्थांना तळेगाव कॅन्सर हॉस्पिटलच्या माध्यमातून विविध सेवा सुविधा पुरवल्या जातील याची ग्वाही ( Rotary City) दिली.
रुडसेट संस्थेची उद्दिष्टे व कार्यपद्धती स्वागत पर मनोगताद्वारे श्री संदीप पाटील यांनी विशद केली कार्यक्रमाचे प्रास्ताविक रोटरी सिटीच्या प्रकल्प प्रमुख वर्षा खारगे यांनी केले. सूत्रसंचालन रोटरी व रुडसेट या दोन्ही संस्थेचे कार्य कुशल निवेदक दिनेश निळकंठ यांनी केले.हरिश्चंद्र बावचे यांनी आभार मानले.
क्लब ट्रेनर सुरेश शेंडे, सह प्रकल्प प्रमुख वैशाली लगाडे, संग्राम जगताप,सुनंदा वाघमारे, विश्वास कदम,स्वाती मुठे, तानाजी मराठे, सचिन भांडवलकर, योगिता गरुड, रवी घोजगे, बाळू अवघडे, राहुल गुप्ते, जयश्री सोनवणे यांनी उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम ( Rotary City) घेतले.