मावळ ऑनलाईन न्यूज : ”गरजू विद्यार्थ्यांना धान्य व खाऊवाटप करुन रोटरॅक्ट क्लबच्या युवकांनी आदर्शवत काम केले आहे. त्यातून इतर युवक-युवतींमध्ये सामाजिक जाणीव वृद्धिंगत होईल. (Rotaract Club Activity) समाज परिवर्तन करण्यासाठी युवाशक्तीची जबाबदारी अधिक आहे, म्हणून युवा वर्गाने आपण देशाचे भविष्य आहोत हे वारंवार आठवणीत आणून समाज आणि राष्ट्र घडवण्यासाठी सक्रिय झाले पाहिजे.” असे मत रोटरी सिटीचे अध्यक्ष भगवान शिंदे यांनी मांडले.
रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे सिटी संचलित रोट्रॅक्ट क्लब ऑफ तळेगाव दाभाडे न्यू सिटी यांच्यातर्फे वतीने केअर हँड्स विद्यार्थी वस्तीगृह आंबी गोळेवाडी व स्वातंत्र्यवीर सावरकर गुरुकुल तळेगाव दाभाडे येथे विद्यार्थ्यांना रेशनिंग व खाऊवाटप करण्यात आले. (Rotaract Club Activity) त्यावेळी शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले. या प्रसंगी रोटरी क्लब ऑफ तळेगाव सिटीचे पदाधिकारी, रोट्रॅक्ट क्लब ऑफ तळेगाव दाभाडे न्यू सिटीचे पदाधिकारी तसेच केअरिंग हँड्स संस्थेचे पदाधिकारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शिंदे म्हणाले, ” आजचे युवक उद्याचे, देशाचे भावी लोकप्रतिनिधी असून समाज परिवर्तनामध्ये युवकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. महाराष्ट्रातील दुर्गम आणि डोंगराळ भागातील दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांचे केअरिंग हँडस संस्थेच्या माध्यमातून मोफत पालन पोषण केले जाते. (Rotaract Club Activity) आर्थिक दुर्बल घटकातील गोरगरीब विद्यार्थ्यांचे स्वातंत्र्यवीर सावरकर गुरुकुलात मोफत पालन पोषण केले जाते. न्यू रोट्रक्ट क्लबने समाजातील अशा गरीब विद्यार्थ्यांसाठी रेशनिंग आणि खाऊ वाटप करून आदर्श निर्माण केला आहे.”
रोट्रक्ट क्लबचे अध्यक्ष ओंकार भांडवलकर यांनी क्लबच्या स्थापनेचा हेतू आणि उद्देश सांगितला. उपाध्यक्ष प्रणव जगताप यांनी सर्व युवकांच्या सहकार्याने सेवाभावी उपक्रमांच्या माध्यमातून क्लब चांगले प्रोजेक्ट भविष्यात करील (Rotaract Club Activity) अशी ग्वाही मनोगताद्वारे दिली. सेक्रेटरी ओंकार दाभाडे यांनी मनोगत व्यक्त केले. अक्षता जुन्नरकर यांनी क्लबच्या कार्यपद्धतीची माहिती दिली.

रोटरी सिटीचे सेक्रेटरी संजय मेहता, आरसीसी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे न्यू सिटी अध्यक्षा फाल्गुनी भाटिया व उपाध्यक्षा सोनाली पाटील यांनी रोट्रॅक्ट क्लबला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. (Rotaract Club Activity) अनुष्कार भेगडे, सार्थक मोडवे, प्रणव भेगडे, आलम पटेल, आशुतोष जंगम, अविनाश, अमित शेलार, कुंदन,हर्ष,अथर्व, हितेश, नीरज, प्रथमेश, अपूर्वा, धनश्री, ओम, आदित्य, कशिश यांनी संयोजन केले.



















