मावळ ऑनलाईन – मावळ तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून ( Rescue operation) सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अशा परिस्थितीत १९ ऑगस्ट २०२५ रोजी मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास गोंडुब्रे गावाजवळील नदीकाठी एक महिला अडकून पडली होती. तिच्या जीवघेण्या अवस्थेत दिलेल्या मदतीच्या आर्त हाकेला तळेगाव दाभाडे पोलिस व वन्यजीव रक्षक मावळ संस्था यांच्या कार्यतत्परतेमुळे प्रतिसाद मिळाला आणि अखेर त्या महिलेचा जीव वाचवण्यात यश आले.
School Holiday : अतिवृष्टीमुळे मावळातील सर्व शाळा आज बंद, सुट्टी भरून काढण्यासाठी रविवारी शाळा
ग्रामस्थांनी “नदीकाठी कोणी तरी मदतीसाठी आवाज देत आहे” अशी ( Rescue operation) माहिती तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्याला दिली. त्यानंतर पोलिस कर्मचारी प्रशांत सोनवणे यांनी तत्काळ वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे संस्थापक निलेश गराडे यांच्याशी संपर्क साधून परिस्थितीची माहिती दिली. गराडे यांनी लगेचच संस्थेच्या आपत्ती व्यवस्थापन समितीला सतर्क केले.
यानंतर विनय सावंत, कमलेश राक्षे यांसारखे स्वयंसेवक तसेच तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. जोरदार पावसातही जीवाची पर्वा न करता मदतकार्य सुरू केले. नदीच्या प्रवाहात झाडाला लटकून जीव वाचविण्याचा प्रयत्न करणाऱ्या ( Rescue operation) त्या महिलेपर्यंत पोहोचून तिला सुखरूप बाहेर काढण्यात आले.
Alandi : इंद्रायणी नदीच्या पाण्याच्या पातळीत मोठी वाढ; नदीपात्रातील पाणी शनी मंदिरापर्यंत
महिलेला तातडीने प्राथमिक उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आले असून सध्या तिची प्रकृती स्थिर असल्याचे समजते.
या धाडसी आणि तत्पर बचाव मोहिमेमुळे ग्रामस्थांनी तळेगाव दाभाडे पोलिस दल व वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे मन:पूर्वक कौतुक केले ( Rescue operation) आहे.