मावळ ऑनलाईन – आजचे पंचांग. महिना – भाद्रपद – शुक्लपक्ष. तिथी – ५. शके १९४७. वार – गुरुवार. तारीख – २८.०८.२०२५. (Rashi Bhavishya 28 August 2025)
शुभाशुभ विचार – उत्तम दिवस.
आज विशेष – ऋषिपंचमी.
राहू काळ – दुपारी ०१.३० ते ०३.००.
दिशा शूल – दक्षिणेस असेल.
आज नक्षत्र – चित्रा ८.४४ पर्यंत नंतर स्वाती. चंद्र राशी – तूळ.
मेष- (शुभ रंग- क्रीम) Rashi Bhavishya 28 August 2025
आज वैवाहिक जोडीदाराकडे तुम्हाला मन मोकळे करावेसे वाटले तरीही हातचे राखूनच बोलणे हिताचे. गोडबोल्या मंडळींच्या फार नादी लागू नका कायदा मोडू नका.
वृषभ (शुभ रंग- मोतिया)
आज सर्वात आधी तब्येतीची काळजी घ्यायला हवी. खाणे पिणे नियंत्रित असावे, वैवाहिक जीवनातील मतभेद फार ताणून धरणे हिताचे नाही.
मिथुन (शुभ रंग – डाळिंबी)
आज काही प्रिय व्यक्तींच्या सहवासात वेळ मजेत जाईल. मुलांची अभ्यासातील प्रगती तुम्हाला समाधान देईल. आज गृहलक्ष्मी हसतमुख असेल.
कर्क ( शुभ रंग- गुलाबी)
आज तुम्हाला काही अतिहुशार मंडळी भेटू शकतात. काही वैचारिक मतभेद होतील. व्यर्थ वाद घालू नका. आज एखाद्या नवीन विषयात तुम्ही रस घ्याल.
Talegaon Dabhade: ऋषिपंचमी निमित्त सामूहिक अथर्वशीर्ष पठण व महिला सन्मान
सिंह ( शुभ रंग- मरून) Rashi Bhavishya 28 August 2025
सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असाल तर तुमच्या मान सन्मानात वाढ होईल. शेजारी सलोखा वाढेल. गृहिणी मात्र झाकली मूठ झाकलीच ठेवणे हिताचे राहील.
कन्या (शुभ रंग- हिरवा)
आज तुमच्या वाणीत जर गोडवा असेल तर बरीच अवघड कामे सोपी होतील नवोदित लेखकांच्या लिखाणाला प्रसिद्धी मिळेल आज कामापुरतेच बोला.

तूळ (शुभ रंग- गुलाबी)
आज तुम्ही एखादा विवाह संबंध जुळवण्यासाठी यशस्वी मध्यस्थी कराल. काही रसिक मंडळी जीवाची मुंबई करतील. मन हळवे करणारा एखादा प्रसंग घडेल.
वृश्चिक ( शुभ रंग- पिस्ता)
नोकरीच्या शोधात असाल तर घरापासून लांब जाण्याची तयारी ठेवावी लागेल. एखाद्या समारंभात सहभागी असाल तर आपल्या किमती वस्तूंची काळजी घ्या.
Pcmc Bappa Gharoghari:पीसीएमसी डॉट न्यूजमध्ये गणेशोत्सवाचा जल्लोष
धनु (शुभ रंग- जांभळा) Rasshi Bhavishya 28 August 2025
आज तुमच्यासाठी स्वप्नपूर्तीचा दिवस आहे. कार्यक्षेत्रात पूर्वी केलेल्या कष्टांची फळे मिळू लागतील. आज दुपारनंतर काही अनपेक्षित खर्च उद्भवतील. मित्रांना पार्ट्या द्याल.
मकर (शुभ रंग- पांढरा)
आज तुम्ही फक्त आपल्या कर्तव्यास प्राधान्य देणार आहात. मोठ्या लोकांशी असलेले तुमचे संबंध तुमच्या व्यवसाय वृद्धीच्या कामी येतील.
कुंभ ( शुभ रंग- पिस्ता)
आज दुपारनंतर कार्यक्षेत्रामध्ये अनुकूल वातावरण राहील. विरोधकांचा विरोध कमी झाल्याचे जाणवेल. ज्येष्ठांना आज नामस्मरणाची उत्तम प्रचिती येईल.
मीन ( शुभ रंग – चंदेरी)
काम कमी आणि दगदगच जास्त होणार आहे. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांचे समाधान होणे कठीणच आहे. झटपट लाभाचा मोह टाळा प्रलोभनांपासून दूर राहा.
शुभम भवतु!
– जयंत कुलकर्णी
ज्योतिष व वास्तुशास्त्र सल्लागार
9689165424