मावळ ऑनलाईन – आजचे पंचांग. महिना – श्रावण – शुक्लपक्ष. तिथी – १३. शके १९४७. वार – बुधवार.तारीख – ०६.०८.२०२५ (Rashi Bhavishya 6 August 2025).
शुभाशुभ विचार – चांगला दिवस.आज विशेष – प्रदोष.राहू काळ – दुपारी १२.०० ते १.३०दिशा शूल – दक्षिणेस असेल.आज नक्षत्र – मूळ १३.०० पर्यंत नंतर पूर्वाषाढा .चंद्र राशी – धनु.
—————————-
मेष- (शुभ रंग- सोनेरी) Rashi Bhavishya 6 August 2025
नोकरदारांनी वरिष्ठांच्या फार पुढे पुढे करू नये. फक्त विचारतील तेवढेच बोलावे. व्यवसायात जाहिरात वाढवावी लागेल. भिडस्तपणा चालणारच नाही.
वृषभ (शुभ रंग- डाळिंबी)
महत्त्वाच्या चर्चा व वाटाघाटी आज नको. भागीदारां मध्ये काही वैचारिक मतभेद होतील. शेअर्स बाजारापासून लांबच रहा. झटपट लाभाचा मोह नकोच.
मिथुन (शुभ रंग – भगवा)
आज जोडीदारास एखादे सरप्राईज गिफ्ट देऊन वैवाहिक जीवनातील गोडवा वाढवता येईल. काही रसिक मंडळी मनोरंजनाच्या कार्यक्रमाचा आस्वाद घेतील.
कर्क ( शुभ रंग- गुलाबी)
कार्यक्षेत्रात प्रामाणिक मेहनतीचे फळ मिळेल. नोकरीत वरिष्ठांकडून तुमच्या राष्ट्र मागण्या मान्य केल्या जातील. तुमची काही येणी वसूल होऊ शकतील.
Bali Pass Trek: हिमशिखरावरील स्वर्गीय अनुभूती देणारा बाली पास ट्रेक !!!
सिंह ( शुभ रंग- क्रीम) Rashi Bhavishya 6 August 2025
तुमच्या कौटुंबिक सुखात वृद्धीच होईल. मुलांची अभ्यासातील कामगिरी समाधानकारक असेल. नोकरदारांना हातचे सोडून पळत्या मागे धावावेसे वाटेल.
कन्या (शुभ रंग- पिस्ता)
बरेच दिवसापासून रखडलेल्या घरगुती कामांकडे लक्ष देणे गरजेचे आहे. काही हौशी गृहिणी घर सजावटीसाठी महागड्या वस्तूंची खरेदी करतील.
तूळ (शुभ रंग- लाल)
आज झालेल्या काही ओळखी भविष्यात कामी येतील. महत्त्वाच्या कामासाठी काही जवळपासचे प्रवास होतील. गैरसमजामुळे दुरावलेली भावंडे एकत्र येतील.
वृश्चिक ( शुभ रंग- जांभळा)
कार्यक्षेत्रात एखादा पेचप्रसंग सोडवण्यात यशस्वी मध्यस्ती कराल. महत्त्वाच्या चर्चेत आपले मत ठामपणे मांडाल. महत्त्वाचे निर्णय विचारांती घ्या.
Pune: द्रुतगती मार्गावर बंद पडलेल्या वाहनाला आयआरबी कडून मदत
धनु (शुभ रंग- तांबडा) Rashi Bhavishya 6 August 2025
अत्यंत आत्मविश्वासाने घराबाहेर पडाल. आर्थिक बाजू भक्कम असल्याने तुमचे मनोबल उत्तम असेल. व्यवसायातील आव्हानांना आज धैर्याने तोंड द्याल.
मकर (शुभ रंग- केशरी)
राशीच्या व्यय स्थानातून चंद्रभ्रमण सुरू असताना जमाखर्चाचे अंदाज चुकणार आहेत. असलेला पैसा जपून वापरा. वृद्धांनी तळपायांची काळजी घ्यावी.
कुंभ ( शुभ रंग- राखाडी)
आज तुमच्यासाठी स्वप्नपूर्तीचा दिवस. कार्यक्षेत्रात तुम्हाला घेतलेल्या कष्टांची फळे मिळतील. यश दृष्टीक्षेपात येईल. आप्तस्वकीयात तुमचा मान सन्मान वाढेल.
मीन ( शुभ रंग – मोरपंखी)
कोणतीही गोष्ट आज सहज मिळणार नाही तरी प्रयत्नांना दैव अनुकूल राहील. आज तुम्ही फक्त आपल्या कर्तव्याला प्राधान्य देणार आहात.
शुभम भवतु!
– जयंत कुलकर्णी
ज्योतिष व वास्तुशास्त्र सल्लागार
9689165424