मावळ ऑनलाईन – आजचे पंचांग. महिना – भाद्रपद – शुक्लपक्ष. तिथी – १३. शके १९४७. वार – शुक्रवार. तारीख – ०५.०९.२०२५. (Rashi Bhavishya 5 Sept 2025)
शुभाशुभ विचार – शुभ दिवस.
आज विशेष – प्रदोष, ईद ई मिलाद.
राहू काळ – दुपारी १०.३० ते १२.००.
दिशा शूल – पश्चिमेस असेल.
आज नक्षत्र – श्रवण २३.३९ पर्यंत नंतर धनिष्ठा. चंद्र राशी – मकर.
मेष- (शुभ रंग- पिस्ता) Rashi Bhavishya 5 Sept 2025
नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ तुमच्या कामावर खूश होऊन तुमच्यावर अतिरिक्त जबाबदाऱ्या सोपवतील. आज कुटुंबीयांची नाराजी पत्करावी लागेल.
वृषभ (शुभ रंग- क्रीम)
कार्यक्षेत्रात ध्येयप्राप्तीसाठी अविश्रांत मेहनत गरजेची आहे. आज नास्तिकही देवाला एखादा नवस बोलतील. उच्चशिक्षितांना विदेश गमनाची स्वप्ने पडतील.
मिथुन (शुभ रंग – स्ट्रॉबेरी)
आज नोकरदारांनी आपण व आपले काम या व्यतिरिक्त इतर कोणत्याही भानगडीत डोकावू नये. आज कायद्याच्या चौकटीतच राहणे हिताचे राहणार आहे.
कर्क ( शुभ रंग- मरून)
आज भावनेच्या भरात कुणालाही वचने देऊ नका. फक्त आपलं कसं चाललंय तेवढेच पहा. आज तुमच्या जोडीदाराच्या चुका काढायची चूक करू नका.
सिंह ( शुभ रंग- चंदेरी) Rashi Bhavishya 5 Sept 2025
आज अहंकार प्रगतीच्या आड येऊ शकतो. मोडण्यापेक्षा थोडसं झुकला तर अनेक कामे सोपी होतील. विरोधकांना चहा पाजून आपला स्वार्थ साधून घ्यावा.
कन्या (शुभ रंग- जांभळा)
कलेच्या क्षेत्रात नवोदीतांना ग्लॅमरची चव चाखता येईल. उच्चशिक्षित मंडळींना उत्तम पॅकेजच्या संधी चालून येतील. रुग्ण आज ठणठणीत बरे होतील.
तूळ (शुभ रंग- मोरपंखी)
आज काही प्रिय पाहुण्यांचे घरात आगमन संभवते. आज इतरांना सल्ले देण्याचा हव्यास टाळा. स्तुती करून विरोधकांनाही आपलेसे करता येईल.
वृश्चिक ( शुभ रंग- पांढरा)
आज तुम्ही इतरांच्या कामी याल. घरगुती समस्यांकडे दुर्लक्ष होईल. कुटुंबीयांची नाराजी पत्करावी लागेल. सामाजिक कार्यकर्त्यांची लोकप्रियता वाढेल.
Dagdusheth Ganpati : श्री गणनायक रथातून निघणार ‘दगडूशेठ’ गणेशोत्सवाची सांगता मिरवणूक
धनु (शुभ रंग- हिरवा) Rashi Bhavishya 5 Sept 2025
आज एखाद्या महत्त्वाच्या चर्चेत तुम्ही आपल्याला मुद्दा ठामपणे मांडाल. विरोधकांशी गोड बोलूनच आपला स्वार्थ साधून घ्यावा लागेल. व्यर्थ वादविवाद टाळा.
मकर (शुभ रंग- डाळिंबी)
आज झालेल्या ओळखी भविष्यात फायदेशीर ठरतील. उपवारांना सुयोग्य स्थळांचे प्रस्ताव येतील. आज तुमचे शारीरिक व मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील.
कुंभ ( शुभ रंग- पिस्ता)
आज तुम्ही स्वतःचे लाड पुरवण्यासाठी वेळ व पैसा खर्च कराल. बचत तर आज शक्य नाही. गृहिणी यथाशक्ती दानधर्म करतील. प्रवासात तब्येत सांभाळा.
मीन ( शुभ रंग – गुलाबी)
कामानिमित्त मोठ्या लोकांशी संबंध येतील. आज यशस्वी लोकांच्या सहवासात तुमच्याही अपेक्षा वाढतील. अडचणीच्या प्रसंगी मोठा भाऊ मदतीस धाऊन येईल.
शुभम भवतु!
– जयंत कुलकर्णी
ज्योतिष व वास्तुशास्त्र सल्लागार
9689165424




















