मावळ ऑनलाईन – आजचे पंचांग. महिना – श्रावण – शुक्लपक्ष. तिथी – १२. शके १९४७, वार – मंगळवार. तारीख – ०५.०८.२०२५ (Rashi Bhavishya 5 August 2025)
शुभाशुभ विचार – ज्येष्ठा वर्ज्य.
आज विशेष – पुत्रदा एकादशी.
राहू काळ – दुपारी ३.०० ते ४.३०
दिशा शूल – उत्तरेस असेल.
आज नक्षत्र – ज्येष्ठा ११.२३ पर्यंत नंतर मूळ. चंद्र राशी – वृश्चिक ११.२३ पर्यंत नंतर धनु.
मेष- (शुभ रंग- चंदेरी) Rashi Bhavishya 5 August 2025
नोकरदारांनी प्रलोभनांना बळी पडू नये. जेष्ठ मंडळींनी आज सल्ले न देता सत्संगात रमावे. आज सरकारी नियम मोडल्याने दंड भरावा लागू शकतो.
वृषभ (शुभ रंग- भगवा)
आज कोणतेही धाडस टाळाच. मोठ्या आर्थिक उलाढाली करताना सावध राहायला हवे. विवाह जुळवण्याविषयी चर्चा उद्यावर ढकला. प्रतिकूल दिवस.
मिथुन (शुभ रंग – डाळिंबी)
आज महत्त्वाच्या चर्चा व वाटाघाटी यशस्वी होतील. तुमच्या वक्तृत्वाचा समोरील व्यक्तीवर सकारात्मक प्रभाव राहील. जोडीदाराला दिलेला शब्द पाळाल.
कर्क ( शुभ रंग- मोतिया)
किरकोळ वाटणारी दुखणी ही दुर्लक्षित करू नका. राशीच्या षष्ठातून चंद्रभ्रमण होत असल्याने काही जुने आजार डोके वर काढतील. काळजी घ्यायला हवी.
Friendship day : प्रशांत दादा भागवत युवामंचतर्फे मैत्री दिनानिमित्त तळेगाव चाकण रस्त्यावरील स्वच्छता
सिंह ( शुभ रंग- गुलाबी) Rashi Bhavishya 5 August 2025
काहीजण थोडावेळ काम बाजूला ठेवूनही आपल्या जुन्या छंदासाठी वेळ काढतील. आज संध्याकाळी एखाद्या प्रिय व्यक्तीचा फोन अचानक येईल.
कन्या (शुभ रंग- क्रीम)
आज राशीच्या चतुर्थ स्थानात चंद्र भ्रमण करत असताना गृहिणी अति व्यस्त असतील. आज मुलांच्या ऑनलाईन अभ्यासात डोकावून बघणे हिताचे राहील.
तूळ (शुभ रंग- पिस्ता)
कार्यक्षेत्रात काही नवे हितसंबंध तयार होतील. तरीही आज नवीन ओळखीत आर्थिक व्यवहार मात्र टाळा. आज जरा आईच्या प्रकृतीची काळजी घ्या.
वृश्चिक ( शुभ रंग- भगवा)
आज खर्च करताना अजिबात काळजी करू नका. राशीच्या धनस्थानातील चंद्र जमा-खर्चाचा तराजू समतोल ठेवेल. कठोर बोलून आपल्या हितचिंतकांना दुखावू नका.
Mallikarjuna Jyotirlinga: कथा दुसऱ्या ज्योतिर्लिंगाची मल्लिकार्जुन महादेवाची
धनु (शुभ रंग- तांबडा) Rashi Bhavishya 5 August 2025
आज मनाच्या लहरीपणावर नियंत्रण ठेवा. व्यवसायात अनुभवींचे मार्गदर्शन घेणे हिताचे राहील. आज स्पर्धकांना कमजोर समजण्याची चूक करू नका.
मकर (शुभ रंग- जांभळा)
बेरोजगारांना घरापासून लांब रोजगार मिळेल. पासपोर्ट विजा संबंधित कामे यशस्वी होतील. रात्रीच्या प्रवासात सावध राहा. मौल्यवान ऐवज जपा.
कुंभ ( शुभ रंग- निळा)
कार्यक्षेत्रातील काही अनुकूल घटना तुमचा कार्य उत्साह वाढवतील. तुमच्या मानसन्मानात वृद्धी होईल. प्रतिष्ठांच्या सहवासात तुमच्या महत्त्वकांक्षा वाढतील.
मीन ( शुभ रंग – राखाडी)
कोणतेही नवे उपक्रम हाती घेण्यासाठी आज योग्य दिवस. तरुणांच्या महत्त्वकांक्षा वाढणार आहेत. आज व्यवसाय वृद्धीसाठी विविध संधी चालून येतील.
शुभम भवतु!
– जयंत कुलकर्णी
ज्योतिष व वास्तुशास्त्र सल्लागार
9689165424