मावळ ऑनलाईन – आजचे पंचांग. महिना – श्रावण – शुक्लपक्ष. तिथी – ६. शके १९४७. वार – बुधवार. तारीख – ३०.०७.२०२५. (Rashi Bhavishya 30 July 2025).
शुभाशुभ विचार – उत्तम दिवस.
आज विशेष – श्रीयाळ षष्ठी.
राहू काळ – दुपारी १२.०० ते १.३०.
दिशा शूल – उत्तरेस असेल.
आज नक्षत्र – हस्त २१.५३ पर्यंत नंतर चित्रा. चंद्र राशी – कन्या.
मेष- (शुभ रंग- राखाडी) Rashi Bhavishya 30 July 2025
कार्यक्षेत्रात विरोधकांच्या कारवाया चालूच राहणार आहेत. आज नोकरदारांनी आपले काम सोडल्यास इतर कोणत्याही भानगडीत लक्ष देऊ नये.
वृषभ (शुभ रंग- जांभळा)
तरुणांच्यात चैनी व विलासी वृत्ती वाढेल. नवोदित कलाकार प्रसिद्धीच्या झोतात येतील. आज मौजमजा करताना कायद्याचे उल्लंघन करू नका.
मिथुन (शुभ रंग – गुलाबी)
व्यवसायात काही नव्या योजना सुरू करता येतील. मातुल घराण्याकडून काहीतरी लाभ होण्याची शक्यता आहे. मुलांचे अति लाड थांबवणे गरजेचे आहे.
कर्क ( शुभ रंग- निळा)
तुम्हाला कौटुंबिक स्तरावर आज काही कठोर निर्णय घ्यावे लागतील. काही जणांचे घरमालकांशी मतभेद होऊ शकतात. वाहनांच्या दुरुस्तीसाठी खर्च होईल.
Pimpri-Chinchwad: पिंपरी-चिंचवडसाठी जिल्हा, अतिरिक्त सत्र न्यायालयाची स्थापना
सिंह ( शुभ रंग- सोनेरी) Rashi Bhavishya 30 July 2025
राशीच्या धनस्थानातील चंद्राने आवक वाढवली तरीही आज तुम्ही बचतीला प्राधान्य देणे गरजेचे आहे. वाणीत गोडवा ठेवा. वादग्रस्त वक्तव्य टाळावीत.
कन्या (शुभ रंग- चंदेरी)
घाई गर्दीत हट्टीपणाने घेतलेले निर्णय चुकतील. कार्यक्षेत्रात अनुभवी व्यक्तींचे मार्गदर्शन जरूर घ्या. वैवाहिक जीवनात जोडीदाराचे हट्ट पुरवाल.
तूळ (शुभ रंग- आकाशी)
काही जणांना तातडीचे प्रवास करावे लागतील. विदेशाशी संबंधित असलेले व्यवसाय चांगले चालतील. विवाह जुळवण्या विषयीच्या बैठकी आज नकोत.
वृश्चिक ( शुभ रंग- लाल)
पूर्वीच्या गुंतवणुकीतून चांगला लाभ पदरात पडू शकतो. शेअर मार्केट मधील तुमचे अंदाज अचूक ठरतील. मुलांकडून काही महत्त्वाचे समाचार येतील.
धनु (शुभ रंग- स्ट्रॉबेरी) Rashi Bhavishya 30 July 2025
आज फक्त कर्तव्याला प्राधान्य द्याल. पैशाचे व वेळेचे योग्य नियोजन करून आज व्यवसायात प्रगतीपथावर राहू शकाल. मुलांच्या आरोग्याला जपा.
मकर (शुभ रंग- क्रीम)
व्यवसायाच्या दृष्टीने विरोधी ग्रहमान असताना मर्यादेबाहेर आर्थिक धाडस करू नका. आज यथाशक्ती दानधर्म कराल. ज्येष्ठांना उपासनेची प्रचिती येईल.
कुंभ ( शुभ रंग- पिस्ता)
कार्यक्षेत्रात प्रत्येक पाऊल सावधपणे टाकायला हवे. आज विश्वासू माणसाकडूनही विश्वासघात होऊ शकतो. जोडीदाराला आर्थिक लाभ होतील.
मीन ( शुभ रंग – हिरवा)
कार्यक्षेत्रात वाढती स्पर्धा तुम्हाला बेचैन करेल. नोकरदारांनी वरिष्ठांशी नम्रपणे वागावे व सहकाऱ्यांशी जुळवून घ्यावे. जमाखर्चाचा तराजू समतोल राहील.
शुभम भवतु!
– जयंत कुलकर्णी
ज्योतिष व वास्तुशास्त्र सल्लागार.
9689165424