Team MyPuneCity – आजचे पंचांग. आजचा दिवस – मंगळवार. तारीख – २९.०४.२०२५ (Rashi Bhavishya 29 April 2025). शुभाशुभ विचार – १९ नंतर चांगला दिवस.
आज विशेष- श्री परशुराम जयंती.
राहू काळ – दुपारी ३.०० ते ०४.३०.
दिशा शूल – उत्तरेस असेल.
आज नक्षत्र- कृतिका १७.४७ पर्यंत नंतर रोहिणी.
चंद्र राशी – वृषभ.
—————————-
मेष- (शुभ रंग- निळा) Rashi Bhavishya 29 April 2025
राशीच्या धनस्थानातून भ्रमण करणारा चंद्र आर्थिक बाजू भक्कम ठेवेल. आज फक्त शब्द हे शस्त्र आहे याचे भान असूद्या. अन्यथा काही नाती दुरावतील.
वृषभ (शुभ रंग- लाल)
कार्यक्षेत्रात अनुकूल वातावरण असेल. नोकरदारांना वरिष्ठांचे पूर्ण सहकार्य असेल. आज अधिकारांचा गैरवापर मात्र टाळा. कायद्यात राहणे हिताचे.
मिथुन (शुभ रंग – हिरवा)
जवळ असलेला पैसा जपून वापरायला हवा. कदाचित संध्याकाळी एखाद्या मोठ्या खर्चाची तयारी ठेवावी लागेल. आज काही दूरची नाती संपर्कात येतील.
कर्क ( शुभ रंग- मोतीया)
आज काही अनुकूल घटना तुमचा कार्य उत्साह वाढवतील. तुमच्या मानसन्मानात वृद्धी होईल. प्रतिष्ठितांच्या सहवासात तुमच्याही महत्त्वकांक्षा वाढतील.
Kalapini : कलापिनीच्या महिलामंचच्या सख्यांनी सादर केला “कलारंग” कार्यक्रम
सिंह ( शुभ रंग- मोरपंखी) Rashi Bhavishya 29 April 2025
कोणतेही नवे उपक्रम हाती घेण्यासाठी आज योग्य दिवस आहे. तरुणांच्या महत्त्वकांक्षा वाढणार आहेत. आज व्यवसाय वृद्धीसाठी विविध संधी चालून येतील.
कन्या (शुभ रंग- डाळिंबी)
नवीन व्यावसायिकांनी मर्यादेबाहेर आर्थिक धाडस करू नये. व्यवसायात जाहिरात वाढवावी लागेल. आज भिडस्त पणाला रामराम ठोकावा लागणार आहे.
तूळ (शुभ रंग- आकाशी)
आज कोणतेही धाडस टाळाच. प्रवासात मौल्यवान वस्तूंची काळजी घ्यायला हवी. विवाह जुळवण्याविषयी चर्चा उद्यावर ढकला प्रतिकूल दिवस.
वृश्चिक ( शुभ रंग- गुलाबी)
आज महत्त्वाच्या चर्चा व वाटाघाटी यशस्वी होतील. तुमच्या वक्तृत्वाचा समोरील व्यक्तीवर सकारात्मक प्रभाव राहील. जोडीदाराला दिलेला शब्द पाळाल.
धनु (शुभ रंग- सोनेरी) Rashi Bhavishya 29 April 2025
कार्यक्षेत्रात प्रामाणिक मेहनतीचे फळ मिळेल. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांना तुमची मते पटू लागतील. आज संध्याकाळी तुम्हाला थोडा थकवा जाणवेल.
मकर (शुभ रंग- चंदेरी)
नेहमीच्या त्याच त्याच कामाचा कंटाळा येईल. आज काही रसिक मंडळी करमणुकीच्या कार्यक्रमाचा आस्वाद घेतील. आधुनिक वस्त्र खरेदी कराल.
कुंभ ( शुभ रंग- राखाडी)
तुमच्या कौटुंबिक सुखात वृद्धी होईल. मुलांची अभ्यासातील कामगिरी समाधानकारक असेल. आज कुटुंबीयांच्या वाढत्या गरजा तुम्ही हौशीने पुरवाल.
मीन ( शुभ रंग – मरून)
आज तुम्हाला काही कामानिमित्त जास्त वेळ घराबाहेर राहावे लागेल काही अप्रिय माणसांचा सहवास सहन करावा लागेल. आज कमीच बोलणे हिताचे.
शुभम भवतु!
– जयंत कुलकर्णी
ज्योतिष व वास्तुशास्त्र सल्लागार
9689165424