Team MyPuneCity – आजचे पंचांग- २८.०३.२०२५ (Rashi Bhavishya 28 March 2025). आजचा दिवस- शुक्रवार. शुभाशुभ विचार – चतुर्दशी, वर्ज्य.
आज विशेष – सामान्य दिवस.
राहू काळ – सकाळी १०.३० ते १२.००.
दिशा शूल – पश्चिमेस असेल.
आज नक्षत्र- पूर्वा भाद्रपदा.
चंद्र राशी – कुंभ १६.४८ पर्यंत नंतर मीन.
—————————-
मेष – ( शुभ रंग – पिस्ता) Rashi Bhavishya 28 March 2025
आज संध्याकाळी चंद्र तुमच्या राशीच्या लाभातून व्यय स्थानाकडे वाटचाल करत असताना असलेला पैसा सांभाळा. काही देणी द्यावी लागणार आहेत.
वृषभ ( शुभ रंग- क्रीम)
कार्यक्षेत्रात केलेल्या कष्टांचे फळ मिळण्याचा दिवस. संध्याकाळी चंद्र राशीच्या लाभात प्रवेश करत असताना उद्योग व्यवसायात यश दृष्टीक्षेपात येईल.
मिथुन – ( शुभ रंग- डाळिंबी)
आज चालून आलेल्या उत्तम संधींचा फायदा घ्या. कामाचे तास वाढवा. काही योग्य माणसे संपर्कात येतील. नकारात्मक लोकांशी संगत टाळावी.
कर्क – ( शुभ रंग – सोनेरी)
आज व्यवसायाच्या दृष्टीने प्रतिकूल दिवस असताना मोठी आर्थिक गुंतवणूक टाळा. आपल्या मर्यादेत रहा. गैरव्यवहार अंगाशी येतील. सतर्क रहा.
सिंह – ( शुभ रंग – पांढरा) Rashi Bhavishya 28 March 2025
आज सगळी महत्त्वाची कामे दिवसाच्या पूर्वार्धातच उरकून घ्या. संध्याकाळी आर्थिक व्यवहार नकोत. वैवाहिक जीवनात थोडेफार वैचारिक मतभेद राहतील.
कन्या – ( शुभ रंग- हिरवा)
व्यावसायिक भागीदारीत काही गैरसमज असतील तर सुसंवादाने मिटतील. वैवाहिक जीवनात संध्याकाळी गोडी गुलाबी राहील. आव्हाने पेलू शकाल.
तूळ ( शुभ रंग- गुलाबी)
आजारी व्यक्तींनी पथ्य पाणी पाळावे. एखादा बरा झालेला आजार परत उलटण्याची शक्यता आहे. रखडलेली येणी मागितली तर वसूल होऊ शकतील.
वृश्चिक ( शुभ रंग- आकाशी)
आज तुम्ही आनंदी व सकारात्मक असाल. रुटीन कामातून थोडा मौजमजेसाठी वेळ काढाल. कुटुंबीयांना पुरेसा वेळ देऊन मुलांचेही लाड पुरवाल.
धनु – ( शुभ रंग – भगवा) Rashi Bhavishya 28 March 2025
आज तुमचा जास्तीत जास्त वेळ घराबाहेरच जाईल. काहींना किरकोळ घर दुरुस्तीची कामे हाती घ्यावी लागतील. तुमची काही गुपिते उघड होतील. कमीच बोला.
मकर – ( शुभ रंग – आकाशी)
अनावश्यक खर्चावर लगाम गरजेचा आहे. दिवसाच्या उत्तरार्धात वाहन दुरुस्तीसाठी खर्च करावा लागेल. कानाची दुखणी असतील तर काळजी घ्यावी.
कुंभ – (शुभ रंग- मोतिया)
मनाच्या लहरीपणास आवर घालणे गरजेचे आहे. नोकरीच्या ठिकाणी सहकाऱ्यांशी मिळून मिसळून वागा. दिवसाच्या उत्तरार्धात लाभ संभवतो.
मीन ( शुभ रंग – सोनेरी)
खर्चाचे प्रमाण खूपच वाढले असेल तरीही काळजी नको. आज दिवसाच्या उत्तरार्धात काही येणी अनपेक्षित पणे वसूल होतील. काही हरवलेले गवसेल.
– जयंत कुळकर्णी
ज्योतिष व वास्तु शास्त्र सल्लागार
फोन 9689165424