मावळ ऑनलाईन – आजचे पंचांग. महिना – आषाढ – शुक्लपक्ष. तिथी – ३.(९.५४ नंतर चतुर्थी), शके १९४७. वार – शनिवार. तारीख – २८.०६.२०२५ (Rashi Bhavishya 28 June 2025).
शुभाशुभ विचार – चांगला दिवस.
आज विशेष – विनायक चतुर्थी.
राहू काळ – सकाळी ९.०० ते १०.३०.
दिशा शूल – पूर्वेस असेल.
आज नक्षत्र – पुष्य ६.३६ पर्यंत नंतर आश्लेषा. चंद्र राशी – कर्क.
मेष- (शुभ रंग- क्रीम) Rashi Bhavishya 28 June 2025
घर बांधकामाशी संबंधित असलेले व्यवसाय उत्तम चालतील. नवीन वाहन खरेदीसाठी कर्ज मंजुरी होईल. प्रेमी युगोलांनी आजच्या दिवस मौन ठेवावे.
वृषभ (शुभ रंग- डाळिंबी)
आज तुमच्या वागण्यात इतरांना आक्रमकता जाणवेल. अति उत्साहात घेतलेले निर्णय चुकू शकतात. रागावर नियंत्रण गरजेचे राहील वाणीत गोडवा असणे हिताचे.
मिथुन (शुभ रंग – राखाडी)
व्यापारी वर्गाला पैसा कमावण्याचे विविध मार्ग सुचतील. आज व्यवसायात मर्यादित रिस्क घ्यायला काहीच हरकत नाही. शक्यतो आज प्रवास टाळावा.
कर्क (शुभ रंग – चंदेरी)
मनाच्या लहरीपणा ला आवर घालणे गरजेचे आहे. मन हळवे करणारा एखादा प्रसंग घडेल. नोकरीच्या ठिकाणी सहकाऱ्यांशी मिळून मिसळून वागावे.
PMRDA : हिंजवडीमधील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी पीएमआरडीए कडून हालचाली
सिंह ( शुभ रंग- मोरपंखी) Rashi Bhavishya 28 June 2025
आज अनावश्यक खर्चावर ताबा असणे गरजेचे आहे. गृहिणींना पूर्वीची बचत कामी येईल. आज संततीच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागणार आहे.
कन्या (शुभ रंग- निळा)
कार्यक्षेत्रात केलेल्या कष्टांचे फळ मिळण्याचा दिवस आहे. चंद्र राशीच्या लाभात असताना उद्योग व्यवसायात यश दृष्टीक्षेपात येईल. संततीचे विवाह योग जुळून येतील.
तूळ (शुभ रंग- गुलाबी)
आज चालून आलेल्या उत्तम संधीचा फायदा घ्या. कामाचे तास वाढवा. काही योग्य माणसे संपर्कात येतील. नकारात्मक लोकांशी संगत टाळावी.
वृश्चिक ( शुभ रंग- मरून)
व्यवसायाच्या दृष्टीने प्रतिकूल दिवस असताना मोठी आर्थिक गुंतवणूक करू नका. आपल्या मर्यादेत रहा. गैरव्यवहार अंगाशी येतील. सज्जनांची संगत धरा.
धनु (शुभ रंग- सोनेरी) Rashi Bhavishya 28 June 2025
महत्त्वाच्या चर्चा आणि व्यावसायिक करार उद्यावरच ढकला. मोठे आर्थिक व्यवहार आज नकोत. वैवाहिक जीवनात थोडेफार वैचारिक मतभेद राहतील पण फार ताणू नका.
मकर (शुभ रंग- भगवा)
व्यावसायिक भागीदारीत काही गैरसमज असतील तर सुसंवादाने मिटू शकतील. वैवाहिक जीवनात संध्याकाळी गोडी गुलाबी राहील. आव्हाने पेलू शकाल.
कुंभ ( शुभ रंग- स्ट्रॉबेरी)
आजारी व्यक्तींनी पथ्य पाणी पाळावे. एखादा बरा झालेला आजार परत उलटण्याची शक्यता आहे. रखडलेली आणि मागितली तर वसूल होऊ शकतात.
मीन ( शुभ रंग – चंदेरी)
आज तुम्ही आनंदी व सकारात्मक असाल. रुटीन कामातून थोडा मौज मजे साठी वेळ काढाल. कुटुंबीयांना पुरेसा वेळ देऊन मुलांसही हट्ट पुरवाल.
शुभम भवतु!
– जयंत कुलकर्णी.
ज्योतिष व वास्तुशास्त्र सल्लागार.
9689165424