मावळ ऑनलाईन – आजचे पंचांग-
शालिवाहन शके १९४७. विश्वावसुनाम संवत्सर. महिना: अश्विन, शुक्लपक्ष. तिथी – ६. तारीख – २७.०९.२०२५. वार – शनिवार. (Rashi Bhavishya 27 Sept 2025)
शुभाशुभ विचार – चांगला दिवस.
आज विशेष- पंचरात्रोत्सवारंभ.
राहू काळ – सकाळी ०९.०० ते १०.३०.
दिशा शूल – पूर्वेस असेल.
आज नक्षत्र- अनुराधा २५.०८ पर्यंत नंतर ज्येष्ठा.चंद्र राशी – वृश्चिक.
मेष – ( शुभ रंग – तांबडा) Rashi Bhavishya 27 Sept 2025
व्यवसायात फार मोठी रिस्क घेण्यासाठी आज दिवस योग्य नाही. नव्यानेच झालेल्या ओळखीत आर्थिक व्यवहार टाळावेत. आज जोडीदाराला लाभ होतील.
वृषभ ( शुभ रंग- स्ट्रॉबेरी)
व्यावसायिक मंडळींना तीव्र स्पर्धेचा सामना करावा लागणार आहे. विरोधक माघार घेतील. आज वैवाहिक जीवनात सामंजस्य असेल.
मिथुन – ( शुभ रंग- मोरपंखी)
एखादा बरा झालेला आजार पुन्हा डोके वर काढण्याची शक्यता आहे. महत्त्वाकांक्षांना थोडा ब्रेक लावून आपल्या प्रकृतीकडेही लक्ष देणे आवश्यक आहे.
कर्क – ( शुभ रंग – राखाडी)
कलाकारांनी आज आलेली कोणतीही संधी वाया घालवू नये. हौशी गृहिणी आज घर सजावटीसाठी मौल्यवान वस्तूंची खरेदी करतील. आनंदी दिवस.
सिंह -( शुभ रंग – पांढरा) Rashi Bhavishya 27 Sept 2025
जमीन खरेदी विक्रीच्या व्यवहारात फायदा होईल. आज नवोदित कलाकारांना मात्र कामासाठी भटकंती करावी लागेल. खेळाडूंना सराव वाढवावा लागेल.
कन्या – ( शुभ रंग- जांभळा)
आपण उच्च अधिकारी असाल तर आज कोणत्याही कागदपत्रांवर सह्या करताना सतर्क रहा. अनोळखी व्यक्तींशी व्यवहार करूच नका. घराबाहेर वाद-विवाद टाळा.
तूळ ( शुभ रंग- चंदेरी)
आज तुमचे मनोबल उत्तम असेल. खर्च वाढला तरी आवकही मुबलक राहील. नेतेमंडळी आज बेधडक वक्तव्य करतील. गोड बोलून स्वतःचा स्वार्थ साधू शकाल.
वृश्चिक ( शुभ रंग – पिस्ता) आज तुमच्या वागण्यात इतरांना हट्टीपणा जाणवेल. महत्त्वाच्या चर्चेत तुम्ही आपल्या मतावर अडून राहाल. आज घरात जोडीदाराचे मत विचारात घ्या.
धनु (शुभ रंग- डाळिंबी) Rashi Bhavishya 27 Sept 2025
आज खर्चाचे प्रमाण मर्यादे बाहेर जाईल. जेष्ठांना काही आरोग्य विषयक तपासण्या करून घ्याव्या लागतील. उष्णतेच्या विकारांची वेळी दखल घेतलेली बरी.
मकर (शुभ रंग- निळा)
आज राशीच्या लाभात चंद्र असताना पूर्वीच्या कष्टांचे फळ मिळण्याचा दिवस. प्रगतीच्या मार्गातील अडथळे दूर होतील. एखादा अनपेक्षित लाभ होईल.
कुंभ – (शुभ रंग- हिरवा)
तरुण मंडळी ध्येयप्राप्तीकडे यशस्वी वाटचाल करतील. अधिकारी वर्गाला काही कठोर निर्णय घ्यावे लागतील. आज रिकाम्या गप्पांसाठी अजिबात वेळ नसेल.
मीन ( शुभ रंग- आकाशी)
आज काही जणांचा गूढ शास्त्रांकडे कल वाढेल. ज्येष्ठ मंडळींना उपासनेची प्रचिती येईल. आज प्रयत्नांना दैव साथ देईल. जाणकारांचे मार्गदर्शन अवश्य घ्या.
शुभम भवतु!
– जयंत कुळकर्णी
ज्योतिष व वास्तु शास्त्र सल्लागार
फोन 9689165424