मावळ ऑनलाईन – आजचे पंचांग. महिना – भाद्रपद – शुक्लपक्ष. तिथी – ४, शके १९४७. वार – बुधवार. तारीख – २७.०८.२०२५. (Rashi Bhavishya 27 August 2025)
शुभाशुभ विचार – आनंदी दिवस.
आज विशेष – श्री. गणेश चतुर्थी.
राहू काळ – दुपारी ०१.३० ते ०३.००.
दिशा शूल – उत्तरेला असेल.
आज नक्षत्र – चित्रा. चंद्र राशी – कन्या १९.२१ पर्यंत नंतर तूळ
मेष- (शुभ रंग- मोतिया) Rashi Bhavishya 27 August 2025
कार्यक्षेत्रात प्रामाणिक मेहनतीचे फळ मिळेल. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ तुमच्या मतांचा आदर करतील. आज संध्याकाळी थोडा थकवा जाणवेल.
वृषभ (शुभ रंग- गुलाबी)
स्टेशनरी, सौंदर्य प्रसाधने इत्यादी व्यवसाय चांगले चालतील. नोकरीला कंटाळलेले नोकरदार एखाद्या धंद्याचे प्लॅनिंग करतील. आज यथाशक्ती चैन कराल.
मिथुन (शुभ रंग – डाळिंबी)
तुमच्या कौटुंबिक सुखात वृद्धीच होईल. मुलांची अभ्यासातील कामगिरी समाधानकारक असेल. काहीजण आज नव्या वाहन खरेदीचा विचार करतील.
कर्क ( शुभ रंग- डाळिंबी)
आज काही महत्त्वाचे समाचार येतील. क्षुल्लक गैरसमजामुळे दूर झालेली भावंडे एकत्र येतील. भाडेकरूंचे घरमालकाशी सौम्य मतभेद होऊ शकतात.
Majha Bappa Gharoghari: घरच्या गणरायाचे छायाचित्र पाठवा, जिंका 101 आकर्षक बक्षिसे!
सिंह ( शुभ रंग- मरून) Rashi Bhavishya 27 August 2025
राशीच्या धनस्थानात भ्रमण करणारा चंद्र तुमची आर्थिक बाजू भक्कम ठेवेल. शब्द हे शस्त्र आहे, याचे मात्र भान ठेवावे लागेल. अन्यथा काही नाती दुरावतील.
कन्या (शुभ रंग- गुलाबी)
आज तुम्ही काहीसे हट्टीपणाने वागाल. तुम्हाला इतरांशी जमवून घेणे अवघड जाईल. आज वादविवाद टाळा. प्रत्येक निर्णय विचारांती घ्यायला हवा.
तूळ (शुभ रंग- क्रीम)
काही जणांना महत्त्वाच्या कामासाठी दूरचे प्रवास घडतील. बेरोजगारांची भटकंती चालूच राहील. आज कंजूषपणा उपयोगाचा नाही. आवश्यक खर्च करावाच लागणार आहे.
वृश्चिक ( शुभ रंग- जांभळा)
आज कार्यक्षेत्रात काही अनुकूल घटना तुमचे मनोबल वाढवतील. प्रतिष्ठितांच्या सहवासात तुमचे विचार प्रगल्भ होतील. मित्र तुमचा हेवा करतील.
Chalihou Festival: पिंपरीत सिंधी बांधवांचा चालिहो उत्सवाची जल्लोषात सांगता
धनु (शुभ रंग- पांढरा) Rashi Bhavishya 27 August 2025
आज व्यवसाय वृद्धीसाठी विविध संधी चालून येतील. कोणतेही नवे उपक्रम हाती घेण्यासाठी आज योग्य दिवस आहे. कोणत्याही क्षेत्रात अनुभवींचे मार्गदर्शन जरूर घ्यावे.
मकर (शुभ रंग- पिस्ता)
नवीन व्यावसायिकांनी आज आळस झटकून कामाला लागणे गरजेचे आहे. भावी योजना इतक्यात उघड करू नयेत. स्पर्धकांना कमजोर समजू नका.
कुंभ ( शुभ रंग- चंदेरी)
आज प्रतिकूल दिवस. आज कोणतेही धाडस टाळाच. कुणीही लढा म्हणले म्हणून लढायला जाऊ नका. विवाह जुळवणे विषयी चर्चा आज नकोत.
मीन ( शुभ रंग – क्रीम)
आज महत्त्वाच्या चर्चा व वाटाघाटी यशस्वी होतील. तुमच्या वक्तृत्वाचा समोरील व्यक्तीवर सकारात्मक प्रभाव राहील. जोडीदाराला दिलेला शब्द पाळावा लागेल.
शुभम भवतु!
– जयंत कुलकर्णी
ज्योतिष व वास्तुशास्त्र सल्लागार.
9689165424