Team MyPuneCity – आजचे पंचांग- २६.०३.२०२५ (Rashi Bhavishya 26 March 2025). आजचा दिवस- बुधवार. शुभाशुभ विचार – शुभ दिवस.
आज विशेष – भागवत एकादशी.
राहू काळ – दुपारी १२.०० ते ०१.३०.
दिशा शूल – उत्तरेस असेल.
आज नक्षत्र- धनिष्ठा.
चंद्र राशी – मकर १५.१५ पर्यंत नंतर कुंभ.
—————————-
मेष – (शुभ रंग – राखाडी) Rashi Bhavishya 26 March 2025
आज भावनेपेक्षा कर्तव्यास प्राधान्य द्याल. कार्यक्षेत्रात चालून आलेल्या संधी सकारात्मकतेने स्वीकाराल. दिवसाच्या उत्तरार्धात एखादा अनपेक्षित लाभ संभवतो.
वृषभ (शुभ रंग- पिस्ता)
आज काही मनाविरुद्ध घटना घडतील. नोकरीच्या ठिकाणी जुन्या चुका निस्तराव्या लागतील. दिवसाच्या उत्तरार्धात कार्यक्षेत्रात अनुकूल वातावरण असेल.
मिथुन – (शुभ रंग- क्रीम)
नोकरदारांना अधिकारी वर्गाचे दडपण जाणवेल. शासकीय नियम काटेकोरपणे पाळा. कामगार वर्गाने आपल्या सुरक्षेची काळजी घ्यायला हवी.
कर्क – (शुभ रंग – सोनेरी)
आज सगळी महत्त्वाची कामे दिवसाच्या पूर्वार्धात उरकून घ्या. वैवाहिक जीवनात संध्याकाळी भांड्याला भांडे लागू शकते. सत्संगाकडे पावले वळवावीत.
सिंह – (शुभ रंग – चंदेरी) Rashi Bhavishya 26 March 2025
किरकोळ आजारावर सुद्धा त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणे हिताचे राहील. वैवाहिक जीवनातील मतभेद संध्याकाळी निवळतील. साधारण दिवस.
कन्या – (शुभ रंग- हिरवा)
कलाकारांनी आज आलेली कोणतीही संधी सोडू नये. ज्येष्ठांनी पथ्य पाणी पाळावे. एखादा बरा झालेला आजारही पुन्हा डोके वर काढू शकतो.
तूळ (शुभ रंग- स्ट्रॉबेरी)
बरेच दिवसापासून रखडलेल्या घरगुती कामात आज लक्ष घालावे लागेल. मुलांची अभ्यासातील कामगिरी कौतुकास्पद असेल. गृहिणी आज अतिव्यस्त.
वृश्चिक (शुभ रंग- भगवा)
कार्यालयीन कामासाठी प्रवास होतील. भावंडात सलोखा राहील. संध्याकाळी एखाद्या कौटुंबिक कार्यक्रमात हजेरी लावाल. मुले अभ्यासात रमतील.
धनु – (शुभ रंग – निळा) Rashi Bhavishya 26 March 2025
विविध मार्गाने आलेला पैसा खर्च करण्याचे तुम्हाला विविध मार्ग सुचतील. शेजाऱ्यांशी काही मतभेद झाले असतील तर ते आज दुपारनंतर निवळतील.
मकर – (शुभ रंग – पांढरा)
आजचा दिवस तुमच्यासाठी अनुकूल आहे. सर्व कामे वेळे आधी पार पडतील. संध्याकाळी काही येणी अनपेक्षित पणे वसूल होतील. तुमचा कार्य उत्साह वाढेल.
कुंभ – (शुभ रंग- आकाशी)
काही जणांना अनपेक्षित घडणारे प्रवास कार्य साधक ठरणार आहेत. विदेशाशी संबंधित असलेले व्यवसाय चांगले चालतील. आज मृगजळा मागे धावू नका.
मीन (शुभ रंग – जांभळा)
सकाळी भरलेले खिसे संध्याकाळी रिकामे होऊ शकतील. ज्येष्ठांनी हाती असलेली पुंजी जपून वापरावी. कलाकारांचा परदेशात नावलौकिक होईल.
– जयंत कुळकर्णी
ज्योतिष व वास्तु शास्त्र सल्लागार
फोन 9689165424