मावळ ऑनलाईन – आजचे पंचांग. महिना – आषाढ – शुक्लपक्ष. तिथी – १. वार – गुरुवार. तारीख – २६.०६.२०२५ (Rashi Bhavishya 26 June 2025). शुभाशुभ विचार – चांगला दिवस. आज विशेष – सामान्य दिवस. राहू काळ – दुपारी ०१.३० ते ३.००. दिशा शूल – दक्षिणेस असेल. आज नक्षत्र – आर्द्रा ०८.४७ पर्यंत नंतर पुनर्वसू. चंद्र राशी – मिथुन.
—————————-
मेष- (शुभ रंग- पांढरा) Rashi Bhavishya 26 June 2025
कार्यालयीन कामासाठी प्रवास होतील. भावंडात सलोखा राहील. विविध मार्गाने आलेला पैसा खर्च करण्याचे तुम्हाला विविध मार्ग सुचतील. आज थोडी दगदग होईल.
वृषभ (शुभ रंग- डाळिंबी)
आजचा दिवस तुमच्यासाठी अनुकूल आहे. सर्व कामे आज वेळेआधी पार पडतील. संध्याकाळी काही येणी अनपेक्षित पणे वसूल होतील. तुमचा कार्य उत्साह वाढेल.
मिथुन (शुभ रंग – मरून)
आज सगळी महत्वाची कामे दिवसाच्या पूर्वार्धात उरकून घ्या. वैवाहिक जीवनात संध्याकाळी भांड्याला भांडे लागू शकते. सत्संगाकडे पावले वळवणे हिताचे राहील.
कर्क ( शुभ रंग- पिस्ता)
काही जणांना अनपेक्षित घडणारे प्रवास कार्य साधक ठरणार आहेत विदेशाशी संबंधित असलेले व्यवसाय आज चांगले चालतील. मृगजळा मागे मात्र धाऊ नका.
सिंह ( शुभ रंग- क्रीम) Rashi Bhavishya 26 June 2025
कार्यक्षेत्रात पूर्वी घेतलेले कष्ट कारणी लागतील. यश आता हाकेच्या अंतरावर आल्याची जाणीव होईल. आज दिवसाच्या उत्तरार्धात एखादा अनपेक्षित लाभ संभवतो.
कन्या (शुभ रंग- हिरवा)
आज तुम्ही केवळ चर्चेपेक्षा कृतीला प्राधान्य द्याल. कार्यक्षेत्रात चालून आलेल्या विविध संधी सकारात्मकतेने स्वीकाराल. नोकरदारांना अधिकारी वर्गाचे दडपण जाणवेल.
तूळ (शुभ रंग- चंदेरी)
आज काही मनाविरुद्ध घटना घडतील. नोकरीच्या ठिकाणी जुन्या चुका निस्तराव्या लागतील. शासकीय नियम काटेकोरपणे पाळणे हिताचे राहील.
वृश्चिक ( शुभ रंग- सोनेरी)
कामगार वर्गाने आपल्या सुरक्षेची काळजी घ्यायला हवी. तरुणांनी प्रलोभनांच्या आहारी जाऊ नये. आज गैरवर्तनाने प्रतिष्ठेची हानी होऊ शकते.
धनु (शुभ रंग- निळा) Rashi Bhavishya 26 June 2025
आज महत्त्वाच्या चर्चा व वाटाघाटी यशस्वी होतील. तुमच्या बोलण्याचा समोरील व्यक्तीवर सकारात्मक प्रभाव राहील. आज तुम्ही जोडीदाराला दिलेला शब्द पाळाल.
मकर (शुभ रंग- लाल)
ज्येष्ठ मंडळींनी पथ्य पाणी पाळावे. एखादा बरा झालेला आजारही पुन्हा डोके वर काढू शकतो. येणी अनपेक्षित पणे वसूल होतील. मामा मावशी कडून महत्त्वाचे समाचार येतील.
कुंभ ( शुभ रंग- आकाशी)
उच्च शिक्षण घेणाऱ्यांच्या महत्त्वकांक्षा वाढतील. कलाकारांनी आज आलेली कोणतीही संधी सोडू नये. खेळाडूंचा आज प्रतिस्पर्ध्यावर विजय नक्की.
मीन ( शुभ रंग – स्ट्रॉबेरी)
बऱ्याच दिवसापासून रखडलेल्या घरगुती कामात आज लक्ष घालावे लागेल. मुलांची अभ्यासातील कामगिरी कौतुकास्पद असेल. गृहिणी आज अतिव्यस्त असतील.
शुभम भवतु!
– जयंत कुलकर्णी
ज्योतिष व वास्तुशास्त्र सल्लागार
9689165424