Team MyPuneCity – आजचे पंचांग. आजचा दिवस – शनिवार. तारीख – २६.०४.२०२५ (Rashi Bhavishya 26 April 2025). शुभाशुभ विचार – क्षयतिथी.
आज विशेष- शिवरात्री.
राहू काळ – सकाळी ९.०० ते १०.३०.
दिशा शूल – पूर्वेस असेल.
आज नक्षत्र- रेवती.
चंद्र राशी – मीन.
—————————-
मेष- (शुभ रंग- पिस्ता) Rashi Bhavishya 26 April 2025
तुमचे खर्चावरील नियंत्रण सुटल्याने जमा-खर्चाचे गणित बिघडेल. नोकरदारांना काही जुन्या चुका निस्तराव्या लागतील. आज घरात थोरांशी वैचारिक मतभेद संभवतात.
वृषभ (शुभ रंग- क्रीम)
दिवस लाभाचा असून आज सगळी महत्वाची कामे सुरळीत पार पडणार आहेत. एखाद्या नवीन उद्योगाचा श्री गणेशा करण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे.
मिथुन (शुभ रंग – मोतीया)
नोकरदारांवर कामाचा ताण प्रचंड वाढणार आहे. घरगुती कामे दुर्लक्षित झाल्याने आज कुटुंबीयांची नाराजी पत्करावी लागेल. मित्रांना आज दुरूनच राम-राम करा.
कर्क ( शुभ रंग- निळा)
नोकरदारांना त्याच त्याच कामाचा कंटाळा येईल. आज वरिष्ठांचेही समाधान होणे कठीण. आज तुमचा आध्यात्मिक मार्गाकडे कल वाढेल. यथाशक्ती दानधर्म कराल.
सिंह ( शुभ रंग- राखाडी) Rashi Bhavishya 26 April 2025
आज फक्त आपल्या कामावर लक्ष केंद्रित करा. आपल्या मर्यादा ओळखणे गरजेचे राहील. घरात जोडीदाराशी सामंजस्याचे धोरण ठेवणे हिताचे.
कन्या (शुभ रंग- हिरवा)
कार्यक्षेत्रात तुमचे महत्त्व वाढेल. विरोधकांचाही जोर कमी झाल्याचे जाणवेल. वैवाहिक जीवनात आज ‘तू तिथे मी’ असे वातावरण असेल. मुले आज्ञेत वागतील.
तूळ (शुभ रंग- स्ट्रॉबेरी)
काही रखडलेली येणी असतील तर ती मागितल्याने वसूल होऊ शकतील. खाण्या-पिण्यावर नियंत्रण गरजेचे आहे. आज पोट बिघडण्याची शक्यता आहे.
वृश्चिक ( शुभ रंग- मरून)
आज तुम्ही आनंदी व उत्साही असाल. बऱ्याच दिवसानंतर काही जुन्या मित्रांच्या सहवासात रमाल. रसिक मंडळी काम बाजूला ठेवूनही मौजमजेला प्राधान्य देतील.
धनु (शुभ रंग- गुलाबी) Rashi Bhavishya 26 April 2025
शेतीवाडी जमीन खरेदी विक्रीचे व्यवहार तुमच्या अपेक्षेनुसार होतील. वाहन खरेदीसाठी कर्ज मंजुरी होऊ शकते. तरुणांनी प्रेमप्रकरणांपासून दूरच राहावे.
मकर (शुभ रंग- सोनेरी)
आज बराच वेळ घराबाहेर जाईल. कामानिमित्त झालेले प्रवास कार्य साधक होतील. शेजारी घरोबा वाढेल. घरमालक व भाडेकरू किरकोळ मतभेद होतील.
कुंभ ( शुभ रंग- पांढरा)
राशीच्या धनस्थानातील चंद्रभ्रमण धंद्यातील आवक वाढवेल. पैशाअभावी रखडलेली काही कामे पूर्ण करता येतील. आज जरा वाणीवर लगाम गरजेच राहील.
मीन (शुभ रंग- चंदेरी)
आज स्वतःचे लाड पुरवण्यासाठी सढळ हस्ताने पैसा खर्च कराल. व्यक्तिमत्व विकासाकडे लक्ष द्याल. जोडीदाराला दिलेली वचनही पाळावी लागतील.
शुभम भवतु!
– जयंत कुलकर्णी
ज्योतिष व वास्तुशास्त्र सल्लागार
9689165424