Team MyPuneCity – आजचे पंचांग. आजचा दिवस – गुरुवार. तारीख – २४.०४.२०२५ (Rashi Bhavishya 24 April 2025). शुभाशुभ विचार – चांगला दिवस.
आज विशेष- वरुथिनी एकादशी.
राहू काळ – दुपारी १.३० ते ०३.००.
दिशा शूल – दक्षिणेस असेल.
आज नक्षत्र- शततारका १०.४९ पर्यंत नंतर पूर्वा भाद्रपदा.
चंद्र राशी – कुंभ.
—————————-
मेष- (शुभ रंग- पांढरा) Rashi Bhavishya 24 April 2025
व्यापाऱ्यांना आज अपेक्षेपेक्षा जास्त लाभ पदरात पडेल. आप्त स्वकीय तुमच्या शब्दाला मान देतील. आज तुम्ही सहजच घेतलेले निर्णयही योग्यच ठरतील.
वृषभ (शुभ रंग- मोरपंखी)
कार्यक्षेत्रात महत्त्वाचे निर्णय घेताना अनुभवी व्यक्तींचे मार्गदर्शन हिताचे राहील. घरात थोरांच्या मताचा आदर करा. नोकरीत कामाचा बोजा वाढेल.
मिथुन (शुभ रंग – निळा)
उद्योग व्यवसायाच्या दृष्टीने विरोधी दिवस असल्याने आज गुंतवणुकीची फार मोठी रिस्क घेऊ नका. ज्येष्ठ मंडळींचा देव धर्माकडे कल वाढेल. तीर्थयात्रा होतील.
कर्क ( शुभ रंग- स्ट्रॉबेरी)
आर्थिक बाजू भक्कम असल्याने सर्व कामे सुरळीत पार पडतील. सभा संमेलनात तुमच्या वक्तृत्वाचा प्रभाव पडेल. दिवसाच्या उत्तरार्धात कोणतेही धाडस नकोच.
Maval News : मावळमधील १०३ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या आरक्षणासाठीची सोडत संपन्न
सिंह ( शुभ रंग- जांभळा) Rashi Bhavishya 24 April 2025
नोकरीच्या ठिकाणी तुमचे महत्त्व वाढेल. पूर्वीचे कष्ट कारणी लागतील. प्रगतीच्या मार्गातील अडथळे दूर होतील. तुमच्या प्रामाणिक प्रयत्नांना आज नशिबाची साथ नक्की मिळेल.
कन्या (शुभ रंग- डाळिंबी)
आज मित्रांनी केलेल्या खोट्या स्तुतीनेही तुम्ही भारावून जाल. प्रवास कार्य साधक होतील. आज कंजूषणा न करता काही अत्यावश्यक खर्च करावेच लागणार आहेत.
तूळ (शुभ रंग- आकाशी)
आज खिशात पैसा खेळता असल्याने तुमची मनस्थिती उत्तम असेल. तुमच्यातील सकारात्मकता इतरांना प्रभावित करेल. इतरांना दिलेले शब्द आवर्जून पाळाल.
वृश्चिक ( शुभ रंग- हिरवा)
तुमच्या सामाजिक प्रतिश्ठेत वाढ होईल. आज घरात सज्जनांची उठबस राहील. गृहिणी स्वतःचे छंद जपतील. जमाखर्चाचा तराजू समतोल राहील. गृह सौख्याचा दिवस.
धनु (शुभ रंग- चंदेरी) Rashi Bhavishya 24 April 2025
वैवाहिक जीवनात सुसंवाद असेल. जोडीदाराला दिलेले शब्द पाळाल. व्यवसायात भागीदारांशी एकमत राहील. आज तुम्ही एखादा विवाह जुळविण्यात मध्यस्थी कराल.
मकर (शुभ रंग- पिस्ता)
आज तुम्ही काहीसे लहरीपणाने वागाल. हातचे सोडून पळत्या मागे धावावेसे वाटेल. तरुणांना आज प्रलोभाने आकर्षित करतील. आज थोडा संयम बाळगण्याची गरज आहे.
कुंभ ( शुभ रंग- सोनेरी)
आपल्या कुटुंबीयांना अभिमानास्पद वाटेल अशी कामगिरी कराल. आज तुम्ही मुलांचे वाढते हट्ट हौशीने पुरवाल. तरुण मंडळींमध्ये चैनी व विलास वृत्ती वाढेल.
मीन (शुभ रंग- गुलाबी)
जे चाललंय ते बरच म्हणायला हवं. कमी श्रमात जास्त लाभाचा मोह नको. आज दिवसाच्या उत्तरार्धात काही अनपेक्षित येणी वसूल होऊ शकतील. आशादायी दिवस.
शुभम भवतु!
– जयंत कुलकर्णी
ज्योतिष व वास्तुशास्त्र सल्लागार
9689165424