situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Rashi Bhavishya 23 April 2025 : कसा जाईल आपला आजचा दिवस?

Updated On:
Rashi Bhavishya 12 May 2025
---Advertisement---

Team MyPuneCity – आजचे पंचांग. आजचा दिवस – बुधवार. तारीख – २३.०४.२०२५ (Rashi Bhavishya 23 April 2025) . शुभाशुभ विचार- १७ नंतर चांगला.
आज विशेष – सामान्य दिवस.
राहू काळ – दुपारी १२.०० ते ०१.३०.
दिशा शूल – उत्तरेस असेल.
आज नक्षत्र- धनिष्ठा १२.०८ पर्यंत नंतर शततारका.
चंद्र राशी – कुंभ.
—————————-
मेष- (शुभ रंग- पांढरा) Rashi Bhavishya 23 April 2025
आजचा तुमचा कामातील उत्साह इतरांना प्रेरणा देईल. आज तुमच्यासाठी यशदायी दिवस असून एखाद्या नव्या व्यवसायाची सुरुवात करण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे.

वृषभ (शुभ रंग- मोरपंखी)
नोकरीच्या ठिकाणी अधिकाऱ्यांचे दडपण राहील. आज बिनचूक कामास प्राधान्य द्यावे. व्यावसायिक मंडळी वाढत्या स्पर्धेचा सामना करण्यासाठी सज्ज असतील.

मिथुन (शुभ रंग – निळा)
सरकार दरबारी असलेली कामे रखडतील. श्रद्धाळू गृहिणींचे देवधर्मात मन रमेश. अध्यात्मिक मार्गात असलेल्या मंडळींना एखादी दिव्य प्रचिती येऊ शकते.

कर्क ( शुभ रंग- मोतिया)
मोठे आर्थिक व्यवहार आज टाळा. शारीरिक कष्टांची कामे करणाऱ्या कामगारांनी आपल्या सुरक्षेची काळजी घ्यावी. घरात जोडीदाराच्या मताला प्राधान्य देणे हिताचे.

Vadgaon News: वडगाव येथे सामुदायिक विवाह सोहळ्यात १८ जोडप्यांचा शुभ मंगल सोहळा संपन्न!

सिंह ( शुभ रंग- आकाशी) Rashi Bhavishya 23 April 2025
आज तुमचे मनोबल उत्तम असल्याने तुम्ही कार्यक्षेत्रातील आव्हाने सकारात्मकतेने स्वीकाराल. समोर येणारी प्रत्येक व्यक्ती तुमच्या प्रभावात राहील. घरात जोडीदाराच्या मताला प्राधान्य देणे हिताचे.

कन्या (शुभ रंग- मोरपंखी)
कार्यक्षेत्रात अथक परिश्रमांच्या साह्यानेच प्रगतीची चक्रे गतिमान ठेवता येतील. आज कोणालाच काही सल्ले देण्याच्या भानगडीत पडू नका. स्वतःचा स्वार्थ साधून घेणे हिताचे राहील.

तूळ (शुभ रंग- डाळिंबी)
आज तुम्ही अत्यंत उत्साहाने दिवसाची सुरुवात कराल. सर्व कामे आज विना व्यत्यय पार पडतील. एखादा नवीन विषय शिकून घेण्याकडे तुमचा कल असेल.

वृश्चिक ( शुभ रंग- स्ट्रॉबेरी)
आज तुम्ही कुटुंबीयांना पुरेसा वेळ देण्याचा प्रयत्न कराल. मुलांची अभ्यासातील प्रगती समाधानकारक असेल. कलेच्या क्षेत्रातील नवोदित मंडळींना प्रयत्न वाढवावे लागणार आहेत.

Pahalgam Terrorist Attack : पहलगाममध्ये भीषण दहशतवादी हल्ला : २७ पर्यटक ठार, महाराष्ट्रातील दोघांचा समावेश, पुण्यातील दोन पर्यटक जखमी

धनु (शुभ रंग- चंदेरी) Rashi Bhavishya 21 April 2025
आज घाई गर्दीत घेतलेले निर्णय चुकण्याचीच शक्यता जास्त आहे. मित्रांच्या नादी लागून जे पटत नाही ते करायला जाऊ नका. प्रवासात नवे हित संबंध जुळून येतील.

मकर (शुभ रंग- गुलाबी)
आज खिशात पैसा खेळता राहील. आज विरोधकही मैत्रीचा हात पुढे करतील. काही नाती जपायची असतील तर स्पष्टवक्तेपणाला लगाम घालायला हवा.

कुंभ ( शुभ रंग- हिरवा)
आज काही मना जोगत्या घटना तुमच्या कामातील उत्साह वाढवतील. वैवाहिक जीवनात सुसंवाद राहील. आज तुम्ही इतरांच्या भांडणातही यशस्वी मध्यस्ती करू शकाल.

मीन (शुभ रंग- राखाडी)
आजचा दिवस खर्चाचा आज तुम्हाला काटकसर जमणे शक्य नाही. मनसोक्त खर्च कराल. जेष्ठांची अध्यात्माकडे रुची वाढेल. तरुणांच्यात विलासी वृत्ती वाढेल.

शुभम भवतु!

– जयंत कुलकर्णी
ज्योतिष व वास्तुशास्त्र सल्लागार
9689165424

Follow Us On