Team MyPuneCity – आजचे पंचांग- २१.०३.२०२५ (Rashi Bhavishya 21 March 2025). आजचा दिवस- शुक्रवार. शुभाशुभ विचार – ज्येष्ठा वर्ज्य.
आज विशेष – साधारण दिवस.
राहू काळ – सकाळी १०.३० ते १२.००.
दिशा शूल – पश्चिमेस असेल.
आज नक्षत्र- ज्येष्ठा २५.४६ पर्यंत नंतर मूळ.
चंद्र राशी – वृश्चिक २५.४६ पर्यंत नंतर धनु.
—————————-
मेष – ( शुभ रंग – निळा) Rashi Bhavishya 21 March 2025
राशीच्या अष्टमातून चंद्रभ्रमण होत असताना कोणतेही धाडस टाळणे हिताचे. जे काही चालले ते बरं चाललंय समजा. जोडीदाराच्या मताने घ्या.
वृषभ ( शुभ रंग- राखाडी)
आज काही नवीन नाती जुळतील. व्यवसायात जाहिरातीचे स्वरूप बदलावे लागेल. काही जुन्या तत्त्वांना मुरड घालावी लागेल. आज काही पेच प्रसंग सोडवावे लागतील.
मिथुन – ( शुभ रंग- स्ट्रॉबेरी)
आजचा दिवस कष्टांचा सहज काही मिळेल या भ्रमात राहू नका. आज तुमचे मनोबलही कमीच असेल. महत्त्वाचे निर्णय घेण्यास उशीर करू नका.
कर्क – ( शुभ रंग – मरून)
कला क्रीडा क्षेत्रातील मंडळींना उत्तम संधी चालून येतील. कार्यक्षेत्रातील काही सुखद घटना तुमचा आत्मविश्वास वाढवतील. गृहिणी पार्लर साठी वेळ काढतील.
सिंह – ( शुभ रंग – आकाशी) Rashi Bhavishya 21 March 2025
आज काही घरगुती समस्यांवर लक्ष देणे तुम्हाला गरजेचे वाटेल. गृहिणी वेळात वेळ काढून मुलांच्या पुस्तकात डोकावतील. आज वाहनाची काळजी घ्यावी लागेल.
कन्या – ( शुभ रंग- सोनेरी)
आज घर खरेदीचे किंवा वाहन खरेदीचे व्यवहार टाळलेले बरे. गोडबोल्या मंडळींकडून आलेल्या प्रलोभनांना बळी पडू नका. जनांचे ऐकून मनाचेच करा.
तूळ ( शुभ रंग- लाल)
आज तुम्ही अत्यंत आनंदी व उत्साही असाल. राशीच्या धनातील चंद्र आर्थिक बाजू भक्कम ठेवेल. बरेच दिवसांनी एखादी प्रिय व्यक्ती संपर्कात येईल.
वृश्चिक ( शुभ रंग- चंदेरी)
आज तुम्ही स्वतःसाठी वेळ काढाल. व्यक्तिमत्व विकासाकडे लक्ष द्याल. एखाद्या नवीन विषयात तुम्हाला गोडी वाटेल. आज जोडीदाराचे हट्ट पुरवाल.
धनु – ( शुभ रंग – क्रीम) Rashi Bhavishya 21 March 2025
आज राशीच्या वयातील चंद्र पैसा जपून वापरण्याचा सल्ला तुम्हाला देत आहे. आज संध्याकाळी कदाचित एखादा मोठा खर्च उद्भवू शकतो. काहीजण प्रवासाला निघतील.
मकर – ( शुभ रंग – पिस्ता)
आज समाजातील प्रतिष्ठित लोकांत तुमची उठबस असेल. कुटुंबीयांच्या वाढत्या गरजा हौशीने पुरवाल. दिवसाच्या उत्तरार्धात एखादा लाभ होण्याची शक्यता आहे.
कुंभ – (शुभ रंग- पांढरा)
ध्येय साध्य करण्यासाठी अथक परिश्रमां शिवाय कोणताही शॉर्टकट नाही. आज तुम्ही आपल्या कर्तव्याला प्राधान्य द्याल. अधिकारांचा गैरवापर करू नका.
मीन ( शुभ रंग – भगवा)
सर्व कामे सुरळीत पार पडतील. एखाद्या नवीनच विषयात तुम्ही सखोल ज्ञान मिळवाल. गूढ शास्त्राबद्दल तुमची उत्सुकता वाढेल. आज दानधर्म कराल.
– जयंत कुळकर्णी
ज्योतिष व वास्तु शास्त्र सल्लागार
फोन 9689165424