situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Rashi Bhavishya 21 June 2025 : कसा जाईल आपला आजचा दिवस?

Published On:
Rashi Bhavishya 2 August 2025

मावळ ऑनलाईन – आजचे पंचांग. महिना – ज्येष्ठ कृष्णपक्ष. तिथी – ११ (७.१९ नंतर). वार – शनिवार. तारीख – २१.०६.२०२५ (Rashi Bhavishya 21 June 2025)
शुभाशुभ विचार – क्षय तिथी.
आज विशेष – योगिनी एकादशी.
राहू काळ – सकाळी ९.०० ते १०.३०.
दिशा शूल – पूर्वेस असेल.
आज नक्षत्र – अश्विनी १९.५० पर्यंत नंतर भरणी. चंद्र राशी – मेष.

मेष- (शुभ रंग- डाळिंबी) Rashi Bhavishya 21 June 2025
आज तुमचा आत्मविश्वास दांडगा असेल. कार्यक्षेत्रात वाढीव जबाबदाऱ्या स्वतःहून स्वीकाराल. आज आपल्या तापट स्वभावावर मात्र नियंत्रण गरजेचे आहे.


वृषभ (शुभ रंग- राखाडी)
काही साध्या कामात सुद्धा अनपेक्षित अडचणी येतील. घरात थोर मंडळी आपलेच खरे करतील. मुलांच्या आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. खर्च वाढेल.


मिथुन (शुभ रंग – जांभळा)
आज तुम्ही काही सहज घेतलेले निर्णय ही योग्य ठरतील. कमी श्रमात जास्त लाभ देणारा आजचा दिवस वेळेचे योग्य नियोजन करून सत्कारणी लावा.


कर्क ( शुभ रंग- पांढरा)
नोकरीच्या ठिकाणी अधिकारी वर्गाला काही अटीतटीचे प्रश्न सोडवावे लागतील. तरुणांच्या महत्त्वकांक्षा वाढतील. आज मित्र मात्र दगा देतील सतर्क रहा.

Maval : मावळमध्ये ९ अजगरांना जीवदान; वन विभाग आणि वन्यजीव रक्षक संस्थेचे कौतुकास्पद कार्य


सिंह ( शुभ रंग- लाल) Rashi Bhavishya 21 June 2025
उद्योग धंद्यातील वाढत्या स्पर्धेमुळे आज व्यावसायिक मंडळी त्रस्त असतील. आज नास्तिक असला तरी सुद्धा देवाला एखाद्या नवस बोलण्याचा मोह होईल.


कन्या (शुभ रंग- गुलाबी)
नोकरी व्यवसायात काही अनपेक्षित अडचणींचा सामना करावा लागू शकतो. काही चुकीची माणसे संपर्कात येतील. झटपट लाभाचा मोह टाळायला हवा.


तूळ (शुभ रंग- स्ट्रॉबेरी)
समोर येणारी प्रत्येक व्यक्ती तुमच्या प्रभावात राहील. आज तुम्ही सहकार्यांवर ही आपली मते लादू शकाल. आज घरात मात्र जोडीदाराचे मत विचारात घ्यावे.


वृश्चिक ( शुभ रंग- मोरपंखी)
नोकरीच्या शोधात असाल तर आज आलेली संधी सोडू नका. मामा मावशीकडून काही महत्त्वाचे समाचार येतील. आरोग्याच्या तक्रारींची वेळीच दखल घेणे हिताचे राहील.

Pune : वारकऱ्यांना ‘जगद्गुरु संत शिरोमणी तुकाराम महाराज जीवनगौरव पुरस्कार 2025’ प्रदान


धनु (शुभ रंग- चंदेरी) Rashi Bhavishya 21 June 2025
आज शालेय उपयोगी वस्तूंचे व्यवसाय चांगले चालतील. उच्चशिक्षित तरुण मंडळी ध्येयप्राप्तीच्या दिशेने वाटचाल करतील. सहकुटुंब चैन कराल.


मकर (शुभ रंग- भगवा)
समाजकार्य बाजूला ठेवून घरगुती कामात लक्ष देणे हिताचे राहील. आज गृह सौख्याचा दिवस. मुलांचे लाड आवरते घेऊन त्यांच्या शिस्तीला प्राधान्य द्यायला हवे.


कुंभ ( शुभ रंग- पांढरा)
आपली कामे सोडून इतरांच्या भानगडीत लक्ष घालण्याचा मोह होईल. आज घराबाहेर काही अति हुशार मंडळ भेटणार आहेत. कमीच बोललेले बरे.


मीन ( शुभ रंग – निळा)
आज काही सज्जन माणसे संपर्कात येतील. चांगली वैचारिक देवाणघेवाण होईल. आज झालेल्या ओळखी भविष्याच्या दृष्टीने फायदेशीर ठरतील.

शुभम भवतु!

– जयंत कुलकर्णी
ज्योतिष व वास्तुशास्त्र सल्लागार.
9689165424

Follow Us On