मावळ ऑनलाईन – आजचे पंचांग. महिना – श्रावण – कृष्णपक्ष. तिथी – ११, शके १९४७. वार – मंगळवार. तारीख – १९.०८.२०२५. (Rashi Bhavishya 19 August 2025)
शुभाशुभ विचार – चांगला दिवस.
आज विशेष – अजा एकादशी.
राहू काळ – दुपारी ०३.०० ते ०४.३०.
दिशा शूल – उत्तरेस असेल.
आज नक्षत्र – आर्द्रा. चंद्र राशी – मिथुन.
मेष- (शुभ रंग- गुलाबी) Rashi Bhavishya 19 August 2025
आज तुम्ही इतरांच्या कामी याल. घरगुती समस्यांकडे तुमचे दुर्लक्ष होईल. कुटुंबीयांची नाराजी पत्करावी लागेल. सामाजिक कार्यकर्त्यांची लोकप्रियता वाढेल.
वृषभ (शुभ रंग- क्रीम)
आज तुमचे मनोबल उत्तम असेल. काही जुनी येणी वसूल झाल्याने व्यवसायात आर्थिक चिंता दूर होतील. लहान भावंडास मदत कराल. कुटुंबीय आनंदी असतील.
मिथुन (शुभ रंग – पिस्ता)
आज तुमच्या राशीत भ्रमण करणारा चंद्र तुम्हाला दिवसभर आनंदी उत्साही ठेवेल. आज काहीसे लहरी पणाने वागाल. स्वतःच्याच प्रेमात असाल.
कर्क ( शुभ रंग- राखाडी)
मोठे आर्थिक व्यवहार आज टाळलेत बरे होईल. कार्यक्षेत्रात स्पर्धकांना कमजोर समजू नका. व्यवसायात जाहिरातीचे स्वरूप बदलावे लागेल.
सिंह ( शुभ रंग- लाल) Rashi Bhavishya 19 August 2025
राशीच्या लाभात चंद्र असताना तुमच्यासाठी इच्छापूर्तीचा दिवस. काटकसर करण्याची गरज नाही. मौजमजा करण्यासाठी पुरेसा पैसा उपलब्ध होईल.
कन्या (शुभ रंग- मोतिया)
आज कार्यक्षेत्रात तुमच्या मानसन्मानात वृद्धीच होईल. मोठ्या ओळखी व्यवसाय वृद्धीच्या कामी येतील. आज नोकरदारांना बढतीचे वेध लागतील.
तूळ (शुभ रंग- स्ट्रॉबेरी)
सहज काहीही मिळणार नसले तरीही आज कोणत्याही क्षेत्रात तुमच्या प्रामाणिक प्रयत्नांना यश नक्कीच लाभेल. सरकारी कामे मात्र रखडणार आहेत.
वृश्चिक ( शुभ रंग- आकाशी)
आज हातचे सोडून पळत्या मागे धावू नका. राशीच्या अष्टमातून भ्रमण करणारा चंद्र तुम्हाला आपल्या प्रतिष्ठेची काळजी घेण्याचा सल्ला देत आहे.
Pune: पुणे जिल्ह्यातील प्रमुख धरणे शंभर टक्के भरली; भीमा-नीरा नदीपात्रात विसर्ग सुरू
धनु (शुभ रंग- निळा) Rashi Bhavishya 19 August 2025
आज भावनेच्या भरात कुणालाही वचने देऊ नका. फक्त आपलं कसं चाललंय तेवढेच पहा. समोरील व्यक्तीवर तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव पडेल.
मकर (शुभ रंग- जांभळा)
अहंकार प्रगतीच्या आड येऊ शकतो. मोडण्यापेक्षा थोडसं झुकला तर अनेक कामे सोपी होतील. विरोधकांशी गोड बोलून आपला स्वार्थ साधून घ्यावा.
कुंभ ( शुभ रंग- चंदेरी)
उच्चशिक्षित मंडळींना उत्तम पॅकेजच्या संधी चालून येतील. रुग्ण ठणठणीत बरे होतील. कलेच्या क्षेत्रात नवोदित मंडळींना ग्लॅमरची चव चाखता येईल.
मीन ( शुभ रंग – आकाशी)
आज घरात काही प्रिय पाहुण्यांचे आगमन संभवते. कुणालाही मागितल्या शिवाय सल्ले देऊ नका. आज स्तुती करून विरोधकांची ही मने जिंकता येतील.
शुभम भवतु!
– जयंत कुलकर्णी
ज्योतिष व वास्तुशास्त्र सल्लागार.
9689165424