मावळ ऑनलाईन – आजचे पंचांग. महिना – श्रावण – कृष्णपक्ष. तिथी – १०, शके १९४७. वार – सोमवार. तारीख – १८.०८.२०२५ (Rashi Bhavishya 18 August 2025)
शुभाशुभ विचार – भद्रा वर्ज्य.
आज विशेष – शिवमुष्टी ( जवस ).
राहू काळ – सकाळी ०७.३० ते ०९.००.
दिशा शूल – पूर्वेस असेल.
आज नक्षत्र – मृग. चंद्र राशी – वृषभ १४.४० पर्यंत नंतर मिथुन.
मेष- (शुभ रंग- क्रीम) Rashi Bhavishya 18 August 2025
विविध मार्गाने आलेला पैसा जाण्यासाठी विविध मार्ग तयारच असतील. तुमच्या कठोर बोलण्याने काही आपलीच माणसे दुखावतील. कमीच बोला.
वृषभ (शुभ रंग- गुलाबी)
आज दुपारनंतर अनपेक्षित पणे काही रक्कम हात येईल. तुमचा अहंकार वाढवणारी एखादी घटना घडेल. कुठेही आपलीच मर्जी चालवण्याचा तुम्ही प्रयत्न कराल.
मिथुन (शुभ रंग – चंदेरी)
तुमची एखादी हरवलेली वस्तू आज दुपारनंतर शोधलीत तर सापडेल. कौटुंबिक वातावरण सामंजस्याचे राहील. आज जमाखर्चाचा तराजू समतोल राहील.
कर्क ( शुभ रंग- भगवा)
आज दुपारनंतर लाभातून व्यय स्थानी जाणारा चंद्र काही अनपेक्षित प्रवास घडवून आणेल. ध्यानीमनी नसताना एखाद्या न परवडणारा खर्चही करावा लागेल.
सिंह ( शुभ रंग- क्रीम) Rashi Bhavishya 18 August 2025
नोकरीच्या ठिकाणी काही मनाजोगत्या घटना घडतील. तुमच्या प्रगतीचा मार्ग प्रशस्त होईल. नवीन व्यावसायिकांना यश जवळच आल्याची जाणीव होईल.
कन्या (शुभ रंग- जांभळा)
आज महत्त्वाचे निर्णय घेण्यास तुम्हाला विलंब लागेल. काही चांगल्या संधी त्यामुळे हातून निसटतील. दुपारनंतर आत्मविश्वास वृद्धिंगत करणारी एखादी घटना घडेल.
तूळ (शुभ रंग- राखाडी)
आज जास्त लाभाच्या अशाने कुठलेही आर्थिक धाडस करू नका. फसवणूक होऊ शकते. नोकरदारांनी नोकरीच्या ठिकाणी नियमांचे बंधन पाळावे.
वृश्चिक ( शुभ रंग- हिरवा)
महत्त्वाची सर्व कामे आज दिवसाच्या पूर्वार्धातच केल्यास यशस्वी होऊ शकतील. पत्नीला दिलेला शब्द मोडू नका. संध्याकाळी वाहन सावधपणे चालवा.
Chakan: सोनसाखळी हिसकावणारी टोळी जेरबंद ;खुनाचा गुन्हाही उघडकीस
धनु (शुभ रंग- सोनेरी) Rashi Bhavishya 18 August 2025
आज जे काही कराल ते तब्येतीला जपून करा. आज तुम्हाला विश्रांतीही गरजेची आहे. हितचिंतक व हितशत्रू यांच्यातील फरक कळणे अवघड जाईल.
मकर (शुभ रंग- मारून)
आज काहीही करताना तुम्ही फक्त आपल्या मनाचा कौल घ्या. आज येणाऱ्या काही चांगल्या संधींचा सकारात्मकतेने वापर करा. छान दिवस आहे.
कुंभ ( शुभ रंग- मोरपंखी)
प्रॉपर्टी खरेदी विक्रीच्या व्यवहारातून आज चांगला फायदा होईल. मुलांच्या आरोग्याच्या तक्रारींची वेळी दखल घ्यावी लागेल. आईचे मन मोडू नका.
मीन ( शुभ रंग – स्ट्रॉबेरी)
आपले जुने छंद जोपासण्यासाठी वेळ व पैसाही खर्च कराल. आज तुम्हाला इतरांशी जमवून घेणे जरा अवघडच जाईल. शेजाऱ्यांशी मतभेद होतील.
शुभम भवतु!
– जयंत कुलकर्णी
ज्योतिष व वास्तुशास्त्र सल्लागार.
9689165424